Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

दहावींच्या तीन मुलींचे आक्षेपार्ह फोटो केले व्हायरल

पुणे पोलिसांनी तीन मुलांना घेतले ताब्यात

पुणे ः हडपसर परिसरातील एका शाळेत दहावीत शिकणार्‍या तीन मुलींचे नग्न अवस्थेत फोटो मॉर्फ करून सोशल मीडियावर व्हायरल केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकी

मणिपूरमध्ये पुन्हा उफाळला हिंसाचार
कायमस्वरूपी वीज पुरवठा खंडित असलेल्या ३८ हजार ग्राहकांना नोटिस
पीएफआयच्या 11 जणांविरोधात आरोपपत्र दाखल

पुणे ः हडपसर परिसरातील एका शाळेत दहावीत शिकणार्‍या तीन मुलींचे नग्न अवस्थेत फोटो मॉर्फ करून सोशल मीडियावर व्हायरल केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी मुलींच्या शाळेतील तीन मुलांना हडपसर पोलिसांनी ताब्यात घेऊन त्यांच्या विरोधात पोलिस ठाण्यात विनयभंग, पोक्सो कायदा व माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, याप्रकरणी एका पीडित मुलीच्या आईने आरोपी मुलांविरोधात तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार 16 वर्षीय मुलांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संबंधित मुलांनी दहावीच्या वर्गात शिक्षण घेणार्‍या तीन मुलींचे नग्न अवस्थेत फोटो मॉर्फ करून सोशल मीडियावर व्हायरल केले. मुलींच्या कुटुंबीयांना हा प्रकार समजल्यावर त्यांनी याप्रकरणी मुलांच्या विरोधात हडपसर पोलिसांत तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. मुलांची वैद्यकीय तपासणी करून त्यांना सुरक्षेसाठी येरवडा सुधारगृहात ठेवण्यात आले आहे. तसेच गुन्ह्यात वापरलेले मोबाइल जप्त करण्यात आले असून याप्रकरणी चौकशी सुरू आहे.

COMMENTS