Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पोलिस ठाणे आणि न्यायालयाच्याआवारातूनच दुचाकीची चोरी

अहमदनगर/प्रतिनिधी - तालुक्यासह जिल्हाभरातून वाहन चोरीच्या घटनामध्ये वाढ होत असून पोलिस प्रशासनाच्या अकार्यक्षमतेमुळे वाहनचोर चांगलेच निर्ढावले अ

पशुहत्येस विरोध केल्याने मढी देवस्थानच्या कर्मचार्‍यांना मारहाण
आजही ग्रामीण भाग विकासापासून कोसो दूर ः ढाकणे
दोन रुपयांसाठी अंध भिकाऱ्यावर धारदार शस्त्राने हल्ला’ | LokNews24

अहमदनगर/प्रतिनिधी – तालुक्यासह जिल्हाभरातून वाहन चोरीच्या घटनामध्ये वाढ होत असून पोलिस प्रशासनाच्या अकार्यक्षमतेमुळे वाहनचोर चांगलेच निर्ढावले असून त्यांना पोलिस व कायद्याची भीती राहिलेली नाही त्यामुळे वाहन चोरटयांनी मोठ्या धाडसाने चक्क पोलिस ठाण्याच्या आवारातून मोटारसायकल चोरून नेल्याची घटना राहुरी पोलीस ठाण्याच्या आवारात घडली. तर अहमनगर न्यायालयाच्या आवारातून देखील मोटारसायकल चोरीस गेल्याची घटना घडली.
       राहुरी पोलिस ठाण्याच्या आवारात चोरीच्या गुन्ह्यात वापरलेली सीडी डॉन मोटारसायकल (क्रमांक एम एच 16 यु 6538 ) राहुरी पोलिसांनी जप्त करून पोलीस ठाण्याच्या आवारात लावलेले होती. 25 ते 26 एप्रिल दरम्यान कोणीतरी अज्ञात चोरट्याने हॅण्डेल लॉक तोडून बनावट चावीने सुरू करून चोरून नेली. या प्रकरणी राहुरी पोलिसांनी पोलिस कॉन्स्टेबल प्रमोद ढाकणे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध चोरीच्या गुन्ह्याची नोंद केली. अधिक तपास पोलिस नाईक राठोड करीत आहे. दुसर्‍या घटनेत अहमदनगर येथील जिल्हा न्यायालयाच्या आवारात असलेल्या पार्किंगमध्ये लावलेली पंचवीस हजार रुपये किमतीची स्प्लेंडर मोटाररसायकल (क्रमांक एम एच 16 झेड 8091 ) कोणीतरी अज्ञात चोरट्याने हँडेल लॉक तोडून बनावट चावीने सुरू करून चोरून नेली. याप्रकरणी भिंगार कॅम्प पोलिसांनी विश्‍वास ज्ञानदेव गाजरे ( राहणार कवडेनगर बालिकाश्रम रोड अ.नगर ) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध चोरीच्या गुन्ह्याची नोंद केली. अधिक तपास पोलीस हवालदार गोर्डे करीत आहे.

COMMENTS