नुपूर शर्माने संपूर्ण देशाची माफी मागावी ; सर्वोच्च न्यायालयाने कठोर शब्दांत फटकारले

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

नुपूर शर्माने संपूर्ण देशाची माफी मागावी ; सर्वोच्च न्यायालयाने कठोर शब्दांत फटकारले

दिल्ली पोलिस आणि वृत्तवाहिनीवर देखील ताशेरे

नवी दिल्ली : प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य करणार्‍या भाजपच्या निलंबित प्रवक्त्या नूपुर शर्मा यांना सर्वोच्च न्यायालयाने कठोर

ओमायक्रोनचा कितपत आहे धोका | LOKNews24
परमबीर सिंग यांच्या अटकेस मनाई
वैनगंगा नदीत 6 महिल्या बुडाल्या

नवी दिल्ली : प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य करणार्‍या भाजपच्या निलंबित प्रवक्त्या नूपुर शर्मा यांना सर्वोच्च न्यायालयाने कठोर शब्दांमध्ये फटकारले असून, याप्रकरणी त्यांनी संपूर्ण देशाची माफी मागण्याचे निर्देश न्यायालयाने दिले आहेत. यासोबतच खटला दाखल करण्याची याचिकाही न्यायालयाने फेटाळून लावली आहे. सर्वोच्च न्यायालयाने त्यांना उच्च न्यायालयात जाण्यास सांगितले आहे. नुपूर शर्मा यांनी पैगंबर यांच्याविषयी केलेल्या वक्तव्यावर शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयाने नाराजी व्यक्त केली.
नुपूरच्या बदलीच्या अर्जावर सुनावणी करताना सुप्रीम कोर्टाने म्हटले की, तिच्या वक्तव्यामुळे देशभरातील लोकांच्या भावना भडकल्या आहेत. आज देशात जे काही घडत आहे त्याला ते वक्तव्य जबाबदार आहे. आम्ही डिबेट पाहिली, चिथावणी देण्याचा प्रयत्न केला गेला, असे न्यायालयाने म्हटले. पण त्यानंतर त्यांनी जे काही म्हटले ते अधिक लज्जास्पद आहे. नुपूर शर्मा आणि तिच्या वक्तव्याने संपूर्ण देश पेटवून दिला आहे. उदयपूरमधील दुर्दैवी घटनेला त्या जबाबदार आहेत. नुपूर शर्माने टीव्हीवर येऊन माफी मागावी असेही न्यायालयाने म्हटले. जेव्हा वकिलाने माफीनामा आणि पैगंबरांवर केलेली टिप्पणी नम्रतेने मागे घेण्याची विनंती केली तेव्हा खंडपीठाने सांगितले की, मागे घेण्यास खूप उशीर झाला. या तक्रारीवरून एका व्यक्तीला अटक करण्यात आल्याचे सर्वोच्च न्यायालयाने सांगितले. मात्र अनेक एफआयआर असूनही त्यांना दिल्ली पोलिसांनी अद्याप हातही लावलेला नाही. नुपूर शर्मा या भाजपच्या प्रवक्त्या आहेत. अलीकडेच त्यांनी एका टीव्ही चर्चेत मोहम्मद पैगंबर यांच्यावर टीका केली होती. याला मोठा विरोध झाला. कुवेत, यूएई, कतारसह सर्व मुस्लिम देशांनीही त्यांच्या वक्तव्यावर टीका केली होती. यानंतर भाजपने नुपूर शर्मा यांना पक्षातून निलंबित केले. मात्र, त्यांनी आपल्या टिप्पणीबद्दल माफी मागितली आहे. मी माझे शब्द मागे घेते असेही त्यांनी सांगितले.

देशातील अशांततेला नुपूर शर्माच जबाबदार
देशात जे काही सुरु आहे, त्यासाठी नुपूर शर्मा ही एकटी महिला जबाबदार असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. त्यांना कशाप्रकारे भडकावण्यात आले होते ती चर्चा आम्ही पाहिली. पण ज्याप्रकारे त्यांनी विधान केले आणि नंतर वकील असल्याचे सांगितले हे लज्जास्पद आहे. त्यांनी संपूर्ण देशाची माफी मागायला हवी, असे न्यायाधीशांनी सांगितले. सर्वोच्च न्यायालयाने यावेळी दिल्ली पोलीस आणि चर्चेचे आयोजन करणार्‍या वृत्तवाहिनीवरही ताशेरे ओढत म्हटले की, दिल्ली पोलिसांनी काय केले? आम्हाला तोंड उघडायला लावू नका. टीव्हीवरील चर्चा नेमकी काय होती? फक्त एका अजेंड्यासाठी होती का? त्यांनी हा विषय का निवडला?. सुप्रीम कोर्टाने यावेळी पोलिसांच्या कारवाईवर प्रश्‍नचिन्ह उपस्थित करताना म्हटले की, जेव्हा तुम्ही इतरांविरोधात गुन्हा दाखल करता, तेव्हा लगेच अटक केली जाते. पण इथे तुमच्याविरोधात गुन्हा दाखल झाल्यानंतर कोणी हात लावण्याची हिंमतही केली नाही.

COMMENTS