Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पुण्यात झिका रूग्णांची संख्या 18 वर

पुणे : पुण्यात झिका बंधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली असून, आणखी दोन गर्भवती महिलांना झिका झाल्याचे आढळले आहे. तर पुण्याच्या ग्रामीण भागात द

भाजप विजय आणि काॅंग्रेस पराभवाची मिमांसा!
कोपरगाव नगरपरिषदेने काढली स्वच्छता जागृती फेरी
राम, नेमाडे आणि समाज !

पुणे : पुण्यात झिका बंधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली असून, आणखी दोन गर्भवती महिलांना झिका झाल्याचे आढळले आहे. तर पुण्याच्या ग्रामीण भागात देखील झिका बाधित रुग्ण आढळले आहे. सासवडमध्ये एका वृद्ध व्यक्तीला झिकाचा संसर्ग झाल्याचे तपासात उघड झाले आहे. यामुळे झिकाबाधितांची रुग्णसंख्या ही 18 वर पोहोचली आहे.
 यातील 10 गर्भवती महिला आहेत. शहरात महापालिकेच्या आरोग्य विभागातर्फे झिकावर उपाय योजना सुरू आहे. पुण्यात झिका बाधित रुग्ण आढळलेल्या परिसरात महापालिकेचे आरोग्य कर्मचारी सर्वेक्षण करत आहेत. गुरुवारी खराडी परिसरातील दोन गर्भवती महिलांना झिकाचा संसर्ग झाल्याचे आढळले आहे. यातील एक महिला ही 32 तर दुसरी ही 25 वर्षांची आहे. या दोघींच्याही नोमली स्कॅन अहवाल बाळाची प्रकृती चांगली असल्याचे दिसत आहे. खराडीत आणखी एक झिका बाधित आढळला आहे. येथील 8 गर्भवती महिलांचे नमुने हे तपासणीसाठी एनआयव्ही प्रयोग शाळेत पाठवण्यात आले आहेत. त्यातील दोघींचे अहवाल प्राप्त झाले असून त्यांना झिकाचा संसर्ग झाल्याचे पुढे आले आहे.

COMMENTS