Homeताज्या बातम्यादेश

हिमाचलमध्ये अनिवासी भारतीय दाम्पत्याला मारहाण

नवी दिल्ली : हिमाचल प्रदेशमधील डलहौजी येथे गाडीच्या पार्कींगच्या कारणावरून अनिवासी भारतीय दाम्पत्याला 100 पेक्षा जास्त जणांच्या समुहाने मारहाण के

जळगाव दूध संघ निवडणुकीत खडसेंना धक्का, भाजप-शिंदे गटाचे वर्चस्व
अ‍ॅड. गुणरत्न सदावर्ते यांच्या पोलीस कोठडीत वाढ ?
राज्यात राज्यपाल बदलाचे वारे

नवी दिल्ली : हिमाचल प्रदेशमधील डलहौजी येथे गाडीच्या पार्कींगच्या कारणावरून अनिवासी भारतीय दाम्पत्याला 100 पेक्षा जास्त जणांच्या समुहाने मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. हा हल्ला झाल्याचे सांगितले जात आहे. पीडित दाम्पत्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती सध्या बरी आहे. पीडित दाम्पत्य हे मुळचे पंबाजामधील असून ते गेल्या 25 वर्षांपासून स्पेनमध्ये राहतात. काही दिवसांपूर्वी परिवारातील सदस्यांच्या भेटीसाठी ते भारतात आले होते. यावेळी हिमाचल प्रदेशातील डलहौजी येथे फिरत असताना गाडी पार्क करण्याच्या मुद्द्यावरून स्थानिकांशी वाद झाला. या वादानंतर 100 पेक्षा जास्त लोकांनी त्यांना मारहाण केली. पोलिसांच्या मदतीने दाम्पत्याला हल्लेखोरांच्या तावडीतून सोडवण्यात आले. आपण पंजाबी असल्याने आपल्याला मारहाण झाल्याचा दावा दाम्पत्याने केला आहे. या घटनेनंतर पंजाबचे अनिवासी भारतीय व्यवहार मंत्री कुलदीप सिंग धालीवाल, अमृतसरचे खासदार गुरजित सिंग औजला आणि अकाली नेते बिक्रम सिंग मजिठिया यांनी रुग्णालयात जाऊन पीडित दाम्पत्याची भेट घेऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. पीडित दाम्पत्याने कंगणा रणौत बरोबर जे केले तेच आम्ही तुमच्याबरोबर करू अशी धकमी हल्लेखोरांनी दिल्याचे सांगत याप्रकरणी कारवाई करण्याची मागणी हिमाचल प्रदेश सरकारकडे केली.

COMMENTS