सध्याच्या काळात सोशल मीडिया हा अनेकांचा सोबतही आहे. प्रवासात आपण सहजपणे फेसबुक किंवा इंस्टासारख्या साइट्सवर रिल्स किंवा व्हिडिओ पाहात बसतो. परंतु
सध्याच्या काळात सोशल मीडिया हा अनेकांचा सोबतही आहे. प्रवासात आपण सहजपणे फेसबुक किंवा इंस्टासारख्या साइट्सवर रिल्स किंवा व्हिडिओ पाहात बसतो. परंतु, मेटा याबाबात युजर्सला मोठा धक्का दिला आहे. इंस्टाग्राम- फेसबुक प्लाटफॉर्म हे अनेक तरुणाईला वेड लावते. प्रवासात किंवा फावल्या वेळेत अनेकजण याचा वापर करतात, सध्या यावर असणाऱ्या रिल्सचा ट्रेंड जगभरात पाहायला मिळत आहे. अशातच आता हे अॅप्स वापरण्यासाठी तुम्हाला पैसे मोजावे लागणार आहे. यामध्ये फेसबुक-इंस्टाचा देखील समावेश आहे. सध्या हे शुल्क युरोपीय देशांसाठी लागू करण्यात आले आहे. परंतु, लवकरच भारतासह इतर देशातही लागू करण्यात येण्याची शक्यता आहे. मेटा आपल्या युजर्सचा डेटाचा वापर करत होता. अशातच युरोपियन देशाच्या नियमानुसार डेटा सुरक्षिततेसाठी मेटाने डेटा ऍक्सेस न करण्यासाठी पैसे मोजण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये वापरकर्त्यांना मेटाकडून कोणतीही जाहिरात मिळणार नाही. तसेच मेटाचे सबस्क्रिप्शन शुल्क 18 वर्षे आणि त्यावरील जास्त वयोगटातील लोकांसाठी आहे
युरोपियन युनियन आणि स्वित्झर्लंडसारख्या देशांसाठी मेटाने चार्जेस लागू केले आहे. १ नोव्हेंबरपासून हे शुल्क आकारले जाईल. मेटा वेब सेवेसाठी महिन्याला 9.99 युरो (सुमारे 880 रुपये) मोजावे लागतील. तसेच iOS आणि Android वापरकर्त्यांना 12.99 युरो (सुमारे 1,100 रुपये) मोजावे लागणार आहे.
COMMENTS