Homeताज्या बातम्यादेश

आता मेट्रोतून दिवसभर फिरा 200 रुपयांत

प्रवाशांसाठी ‘टुरिस्ट स्मार्ट कार्ड’ सेवा उपलब्ध

नवी दिल्ली/प्रतिनिधी ः दिल्ली मेट्रोने आता पर्यटक प्रवाशांसाठी एक सुविधा जारी केली आहे, त्यामुळे 200 रुपयांमध्ये दिवसभर मेट्रोतून फिरता येणार आहे

परिश्रम, संस्कार व सकारात्मकता आनंददायी जीवनाची गुरुकिल्ली – डॉ.भारतभूषण क्षीरसागर
अहमदनगरमध्ये चार बांगलादेशी घुसखोरांना अटक
प्रवाशांनी भरलेल्या मेट्रोत तरुणीची स्टंटबाजी

नवी दिल्ली/प्रतिनिधी ः दिल्ली मेट्रोने आता पर्यटक प्रवाशांसाठी एक सुविधा जारी केली आहे, त्यामुळे 200 रुपयांमध्ये दिवसभर मेट्रोतून फिरता येणार आहे. दिल्ली मेट्रोने प्रवाशांसाठी ‘टुरिस्ट स्मार्ट कार्ड्स’ सुविधा उपलब्ध करून दिली आहे. यामुळे प्रवाशांना अगदी कमी खर्चात मेट्रोतून प्रवास करता येणार आहे. जी-20 परिषद डोळ्यासमोर ठेवून ही सुविधा सुरू करण्यात आली असून पुढील 10 दिवसांसाठीच याचा लाभ घेता येईल.
‘टुरिस्ट स्मार्ट कार्ड्स’ हे कार्ड दिल्ली मेट्रोच्या निवडक स्थानकांवर 4 ते 13 सप्टेंबर दरम्यान बनवता येईल. टुरिस्ट स्मार्ट कार्ड्स हे पाच दिवसांपर्यंत बनवले जाऊ शकते. एक दिवसाची वैधता असलेले हे कार्ड अवघ्या 200 रुपयांत बनवण्यात येत आहे. महत्त्वाचे म्हणजे, या 200 रुपयांत तुम्ही मेट्रोतून हवा तितका प्रवास करू शकतात. तीन दिवसांचे कार्ड बनवणार्‍या प्रवाशांना 100 रुपयांची सूट दिली जात आहे. तीन दिवसांची वैधता असलेल्या हे कार्ड 500 रुपयांत तयार केले जातात. जी-20 परिषद डोळ्यांसमोर ठेवून हे कार्ड जारी करण्यात आले. मात्र, तुम्हीही या कार्डचा फायदा घेऊ शकता. दिल्लीत लाल किल्ला, जामा मशीद, अक्षरधाम, कालकाजी मंदिर अशी अनेक पर्यटन स्थळे आहेत, जिथे तुम्ही अवघ्या 200 रुपयांत जाऊ शकतात. दिल्ली मेट्रोच्या 36 स्थानकांवर हे कार्ड उपलब्ध आहे. ज्यामध्ये काश्मीरी गेट, चांदनी चौक, चावडी चौक, नवी दिल्ली, राजीव चौक, पटेल चौक, केंद्रीय सचिवालय, उद्याग भवन, लोक कल्याण मार्ग, जोर बाग, दिल्ली हाट, लाल किल्ला, जामा मस्जिद, दिल्ली गेट, आयटीओ, मंडी हाऊस, जनपथ, खान मार्केट, जेएलएन स्टेडियम, जंगपुरा, लाजपत नगर, बाराखंबा रोड, रामकृष्ण आश्रम मार्ग, झंडेवालान, सुप्रीम कोर्ट, इंद्र प्रस्थ, साऊथ एक्सटेन्शन, सरोजनी नगर, छतरपूर, कुतुब मीनार, हाऊस खास, नेहरू प्लेस, कालाकाजी मंदीर अक्षरधाम, टर्मिनल 1 आयजीआय एअरपोर्ट आणि करोल बाग या रेल्वे स्थानकांचा समावेश आहे.

COMMENTS