Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

प्राध्यापक पदांच्या भरतीसाठी एमपीएससीकडून अधिसूचना

सातारा : संघ लोकसेवा आयोगानेविविध पदांच्या भरतीसाठी नुकतीच एक अधिसूचना प्रसिध्द केली आहे. याअंतर्गत सहयोगी प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक, सिनिअर असि

चांदोली येथे वीजनिर्मिती सुरू; पाणी साठ्यात वाढ
काळामवाडी येथे तीन घरे आगीत जळून खाक; अंदाजे 15 लाखाचे नुकसान
पाटणच्या कातकरी वस्तीतील नागरिकांचे लसीकरण

सातारा : संघ लोकसेवा आयोगानेविविध पदांच्या भरतीसाठी नुकतीच एक अधिसूचना प्रसिध्द केली आहे. याअंतर्गत सहयोगी प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक, सिनिअर असिस्टंट कंट्रोलर या पदांच्या भरतीसाठी 13 नोव्हेंबर रोजी अधिसूचना जाहीर केली आहे. याअंतर्गत एकूण 36 पदांची भरती केली जाणार आहे. या पदांसाठी अर्ज करू इच्छिणारे सर्व उमेदवार एमपीएससीच्या अधिकृत वेबसाइटवर ऑनलाइन अर्ज करू शकतात. ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम तारीख 2 डिसेंबर 2021 पर्यंत आहे.
उमेदवारांनी नोंद घ्यावी, की शेवटच्या तारखेपूर्वी अर्ज सादर करावा. कारण शेवटच्या तारखेनंतर कोणतेही फॉर्म स्वीकारले जाणार नाहीत. यासोबतच अर्जातील कोणतीही माहिती चुकीची आढळल्यास किंवा ती खोटी असल्याचे आढळून आल्यास अर्ज फेटाळण्यात येईल. अधिकृत अधिसूचना वाचून अर्जदार विविध पदांशी संबंधित शैक्षणिक पात्रता तपासू शकतात.

COMMENTS