मुंबई/प्रतिनिधी : विधानसभेतील विरोधी पक्षनेतेपद मुख्यमंत्र्याच्या खालोखाल पद समजले जाते. मात्र विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवारांनी आपल्याला
मुंबई/प्रतिनिधी : विधानसभेतील विरोधी पक्षनेतेपद मुख्यमंत्र्याच्या खालोखाल पद समजले जाते. मात्र विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवारांनी आपल्याला या पदाच अजिबात रस नसून, या पदातून आपल्याला मुक्त करा, असे त्यांनी पक्षाला जाहीर आवाहन केल्यामुळे अजितदादांच्या नाराजीच्या चर्चा पुन्हा रंगतांना दिसून येत आहे. मुंबईत कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करतांना ते बोलत होते.
यावेळी बोलतांना अजित पवार म्हणाले की, 25 वर्षांच्या जडणघडणीमध्ये नवीन पिढी पुढे येत आहे. शरद पवार यांनी भाकरी फिरवली पाहिजे. राष्ट्रीय मान्यता गेली आहे. बरेच जण मंत्री होतात पण स्वतः शिवाय दुसर्या कोणालाही निवडून आणू शकत नाही. ममता बॅनर्जी पश्चिम बंगाल आणू शकतात, केजरीवाल दोन राज्य आणू शकतात तर शरद पवार सर्वांत उजवे आहेत की नाही? मग आपण स्वतःच्या ताकदीने राज्यात सरकार का आणू शकलो नाही. मुंबई आणि विदर्भात कमजोर पडलो आहे. मुंबईत अध्यक्ष निवडता आला नाही. सेलमध्ये बदल करायचे की नाही? भाषण देऊन पहिला नंबर येणार नाही, अशी स्पष्टी भूमिका यावेळी अजित पवार यांनी घेतली.नव्या चेहराला विधानसभा, लोकसभा निवडणुकीत संधी द्यायची आहे. विरोधी पक्षनेते पदात इंटरेस्ट नाही. मला विरोधी पक्ष नेत्याच्या जबाबदारीतून मुक्त करा आणि संघटनांची जबाबदारी द्या, अशी जाहीर मागणीच अजित पवार यांनी केली आहे. अजित पवार यांची प्रदेश अध्यक्ष होण्याची इच्छा असून विरोधी पक्षनेते पद सोडण्याच्या तयारीत दिसले. संघटनामध्ये मोठी जबाबदारी देण्याची मागणी केली आहे.
COMMENTS