Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

ना. रामराजे यांनी पदाचा वापर फलटणच्या जनतेसाठी करावा : अनुप शहा

फलटण / प्रतिनिधी : फलटण शहरातील सर्व नागरिकांची घरपट्टी माफ करावी, अशी मागणी फलटणचे माजी नगरसेवक अनुप शहा यांनी केली आहे. मुंबईमध्ये घरपट्टी कर म

विशाळगडावरील घटना दुर्दैवी : आ. जयंत पाटील
ध्वजारोहणास विरोध करणार्‍या अधिकार्‍याविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी
पाटण तालुक्यात गव्याच्या हल्ल्यात वृध्द ठार

फलटण / प्रतिनिधी : फलटण शहरातील सर्व नागरिकांची घरपट्टी माफ करावी, अशी मागणी फलटणचे माजी नगरसेवक अनुप शहा यांनी केली आहे. मुंबईमध्ये घरपट्टी कर माफ केला जातो. मग फलटणमध्ये कर का माफ केला जात नाही? असा सवाल अनुप शहा यांनी केला.
मुख्यमंत्र्यांनी आपल्या पदाचा वापर करून मुंबईमधील नागरिकांना दिलासा देण्याचे काम केले आहे. अशाच पध्दतीने फलटण शहरातील नागरीकांना घरपट्टीमधून दिलासा दिला पाहीजे. कोरोना काळात अनेक लोकांच्या नोकर्‍या गेल्या. कोणाचे व्यवसायच ठप्प झाले. त्यामुळे आर्थिक दृष्या अडचणीत आले. यामुळे फलटण तालुक्याचे आणि जिल्ह्याचे नेते तसेच विधान परिषदेचे सभापतीपदी असणार्‍या रामराजेंनीही पदाचा वापर करून फलटणच्या नागरिकांना खर्‍या अर्थाने दिलासा देण्याचे काम करावे, अशी मागणी शहा यांनी केली आहे.
विरोधकांना खोट्या केसमध्ये अडकवण्यासाठी पदाचा गैर वापर करण्यापेक्षा फलटण शहरातील नागरिकांच्या भल्यासाठी हा वापर करावा. अशी टिका करत घरपट्टी माफीसाठी रामराजेंना आवाहन सुध्दा शहा यांनी केले आहे. शहांच्या मागणीची फलटण शहरातील सर्वसामान्य नागरीकांमध्ये चांगलीच चर्चा सुरु झाली आहे.

COMMENTS