Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

 शहराला छत्रपती संभाजीनगर नावाशिवाय दुसर कोणतं नाव देता येणार नाही – आ. प्रदिप जैस्वाल 

छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी - छत्रपती संभाजीनगर, औरंगाबाद शहराला केंद्र सरकारने राज्य सरकारने मंजुरी दिली आहे. यामुळे एमआयएमचे खासदार विरु

निलंबनातून शिक्षकांची हानी मात्र प्रशासनाची चांदी
महापुरुषांची बदनामीच्या निषेधार्थ  हमाल कष्टकऱ्यांनी बाजार समितीसमोर केले निदर्शने
अहमदनगर दक्षिणेतून डॉ. अशोक सोनवणे लढणार लोकसभा

छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी – छत्रपती संभाजीनगर, औरंगाबाद शहराला केंद्र सरकारने राज्य सरकारने मंजुरी दिली आहे. यामुळे एमआयएमचे खासदार विरुद्ध दहशत आहे. त्यावर आमदार प्रदीप जैस्वाल यांची प्रतिक्रिया घेतली असता ते म्हणाले की, या शहराला छत्रपती संभाजीनगर नावाशिवाय दुसरं कोणतं नाव देता येणार नाही. खरं पाहिलं तर काही लोकांच्या पोटात दुखत आहे. निवडणूक जवळ येत आहे. त्यामुळे हा विषय घेऊन आपण पुन्हा खासदारकी जिंकू त्यांची या पाठीमागची जी भूमिका आहे ती स्पष्ट दिसून येत आहे. आमची स्पष्ट भूमिका आहे. ज्या छत्रपती संभाजी महाराजांची डोळे काढले , हात पाय कापले अशा राजाचे या शहराला छत्रपती संभाजीनगर नावा शिवाय दुसरे कोणते नाव देता येत नाही. हातात फोटो घेऊन जर कोणी नाचत असेल तर आम्ही बैठक घेऊन या विषयावर निर्णय घेऊ अशी प्रतिक्रिया आमदार प्रदीप जैस्वाल यांनी दिली आहे.

COMMENTS