पोलिस ठाण्यांतून यापुढे…नो हॅपी बर्थ डे…

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पोलिस ठाण्यांतून यापुढे…नो हॅपी बर्थ डे…

विशेष पोलिस महानिरीक्षकांचे आदेश, वाढदिवस घरी करण्याच्या सूचना

अहमदनगर/प्रतिनिधी : नगर शहर व जिल्ह्यातील पोलिस ठाण्यांत व कार्यालयांमध्ये पोलिस अधिकारी व कर्मचारी यांनी आपले वाढदिवस साजरे करू नयेत, असे आदेश नाशिक

संगमनेरात तब्बल सात तास चालली शिवजयंती मिरवणूक
पुणतांबा ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी कोणाची होणार निवड ?
शिवद्रोही श्रीपादसह बंधू श्रीकांत छिंदमही तडीपार | DAINIK LOKMNTHAN

अहमदनगर/प्रतिनिधी : नगर शहर व जिल्ह्यातील पोलिस ठाण्यांत व कार्यालयांमध्ये पोलिस अधिकारी व कर्मचारी यांनी आपले वाढदिवस साजरे करू नयेत, असे आदेश नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक डॉ. बी. जी. शेखर पाटील यांनी नाशिक विभागातील पाचही जिल्ह्यांच्या पोलिस अधिकारी व कर्मचार्‍यांना दिले आहेत. याबाबत काढलेल्या आदेशात त्यांनी म्हटले आहे की, काही अधिकारी व अंमलदार हे पोलिस ठाण्यांमध्ये वा कार्यालयात आपले वाढदिवस सार्वजनिक स्वरुपांमध्ये साजरे करीत आहेत. हे वाढदिवस साजरे करताना बर्‍याच वेळा ज्यांच्यावर गुन्हे दाखल आहेत, अशा व्यक्ती, दारु, मटका व इतर अवैध धंदा करणारे, पोलिसांवर दबाव आणणारे इत्यादी लोकही सहभागी झालेले दिसून आलेले आहेत. त्याच प्रमाणे वाढदिवस साजरा करताना पोलिस ठाण्यामध्ये किंवा कार्यालयात मोठया आवाजामध्ये लाऊड स्पीकर लावून त्यावर नाचले जात आहे. या प्रकाराचे फोटो व व्हिडीओ सोशल मिडीयावर मोठया प्रमाणावर व्हायरल होत आहेत. या सर्व प्रकारामुळे पोलिस खात्याची प्रतिमा डागाळली जावून समाजामध्ये एक वेगळाच संदेश जात आहे. त्यामुळे जनतेमध्ये पोलिसांबद्दल मोठया प्रमाणावर प्रतिकूल व वाईट मत तयार होत आहे, असे यात आवर्जून स्पष्ट करण्यात आले आहे. आपला वाढदिवस साजरा करणे ही वैयक्तिक बाब असून अधिकारी व अंमलदार यांनी वैयक्तिक स्तरावर आपले वाढदिवस साजरे करणे आवश्यक आहे. यापुढे पोलिस ठाणे आवारात किंवा कार्यालयात कोणाचेही वाढदिवस सार्वजनिकरित्या साजरे करण्यात येवू नयेत. पोलिस अधीक्षक यांनी याबाबत अखत्यारीतील सर्व अधिकारी व अंमलदार यांना लेखी स्वरुपात सूचना देवून यापुढे आपल्या जिल्ह्यातील पोलिस ठाणे अथवा कार्यालयात कोणाचेही वाढदिवस सार्वजनिक स्वरुपात साजरे होणार नाहीत याची दक्षता घ्यावी. याबाबत करण्यात आलेल्या कार्यवाहीचा पूर्तता अहवाल दहा दिवसांत सादर करावा, असेही डॉ. बी. जी शेखर पाटील यांनी आदेशात म्हटले आहे. दरम्यान, वाढदिवस साजरा करणे ही वैयक्तिक बाब असल्याने पोलिस ठाण्यात वाढदिवस साजरे करण्यास करण्यात आलेला मज्जाव चर्चेचा झाला आहे.

COMMENTS