Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मालेगावचा ढेकूण चिरडायला तोफेची गरज नाही

जाहीर सभेत खा. राऊतांची पालकमंत्र्यांवर जळजळीत टीका

नाशिक : मालेगावचा ढेकूण चिरडायला तोफेची गरज नाही. शिवसेना तुटली नाही, झुकली नाही आणि थांबलीही नाही. राज्यातील सर्व जातीधर्माची माणसे आपल्याम

संगणक परिचालकांचा ग्रामपंचायतीच्या आकृतीबंधात समावेश करणार – ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ
मतांसाठीच भारतरत्न देण्याचा डाव
बुलढाणा जिल्ह्यात सूक्ष्म सिंचन पद्धतीला शेतकऱ्यांचा उत्तम प्रतिसाद

नाशिक : मालेगावचा ढेकूण चिरडायला तोफेची गरज नाही. शिवसेना तुटली नाही, झुकली नाही आणि थांबलीही नाही. राज्यातील सर्व जातीधर्माची माणसे आपल्यामागे उभी आहेत, हे सांगण्यासाठी ही सभा आहे. मालेगावात आज तुफान उसळले असुन या तुफानाला रोखण्याची ताकद कुणातही नाही. मालेगावचे शोले आज भडकलेले आहेत. शिवसेना काय आहे हे निवडणूत आयोगाने इथे येऊन पाहावे. निवडणूक आयोगाला विचारुन बाळासाहेब ठाकरेंनी शिवसेनासभेला उद्देशून राऊत म्हणाले की, महाराष्ट्रातील शेतकर्‍यांचे, बेरोजगारांचे, कष्टकर्‍यांचे प्रश्न सोडवायचे आहेत. कांद्याला भाव मिळत नाही. मात्र, आपल्याला सुहास कांदेंना रस्त्यावर फेकून कांद्याला भाव द्यायचाय. गुलाबराव पाटील यांना रस्त्यावर फेकायचंय. गद्दारांना धडा शिकवायचा आहे. गद्दारांना खोक्यांखाली चिरडायचे आहे. ज्या कर्मवीर भाऊसाहेब हिरे यांनी प्रबोधनकार ठाकरे यांच्या खांद्याला खांदा लावुन संयुक्त महाराष्ट्राच्या स्वातंत्र्यासाठी लढा दिला. त्यांचेच वारस इथे बसले आहेत.

महाराष्ट्रात आता नवीन वारे सुरू झाले आहे. शिवसेना हललेली नाही, तुटलेली नाही आणि झुकलेलीदेखील नाही, असे सांगतानाच खा. राऊत यांनी इलेक्शन कमिशनने आमचे चिन्ह, नाव काढुन घेतले आहे. मात्र, तरीही बाळासाहेबांनी स्थापलेली शिवसेना कुठेही कमी झालेली नाही. उद्धव ठाकरे यांना पुन्हा एकदा मुख्यमंत्री बनवून कष्टकरी व शेतकरी, बेरोजगांना न्याय मिळवून देऊ, असे उद्गारही त्यांनी भाषणाच्या शेवटी केले. स्थापन केली नाही, अशी जळजळीत टीका संजय राऊत यांनी शिंदे सरकारवर केली.

शिंदे सरकारचा समाचार घेण्यासाठी उध्दव ठाकरे यांची रविवारी (दि.27) मालेगावी जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी खासदार राऊत बोलत होते. ते पुढे म्हणाले की, इथे बसलेले सर्व प्रामाणिक आणि निष्ठावंत शिवसैनिक आहेत. ही शिवसेना पुन्हा एकदा विधानसभेवर भगवा फडकावेल आणि उध्दव ठाकरेंना मुख्यमंत्री बनवेल. या पृथ्वीवर बाळासाहेब ठाकरे नावाचा अद्भुत माणुस जन्मला ज्याने शिवसेना स्थापन केली. तीच ही शिवसेना मैदानावर दिसतेय. उध्दव ठाकरेंच्या प्रामाणिक नेतृत्वामागे शिवसेना उभी आहे. चिते की चाल, बाजीराव की तलवार और उध्दव ठाकरे की प्रामाणिकतापर संदेह नही किया जाता, असे सांगत त्यांनी उद्धव ठाकरेंवर विश्वास दर्शविला.

COMMENTS