Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

निवारा बालगृह समाजाला दिशा देणारे ठिकाण ः आमदार सुरेश धस

जामखेड/प्रतिनिधी ः वंचित, अनाथ बालकांना आपल्या हक्कांचे बालगृह उपलब्ध करून देत, खर्‍या अर्थाने ही निवारा बालगृहे समाजाला दिशा देत आहेत. जामखेड ये

‘समृद्धी’च्या 26 किलोमीटरच्या सर्व्हिस रोडसाठी 52 कोटी मंजूर
गोदावरीच्या उजव्या कॅनालमध्ये बुडून वृद्धाचा मृत्यू
कोपरगावातील चार सेतूचालकांविरूध्द गुन्हे दाखल

जामखेड/प्रतिनिधी ः वंचित, अनाथ बालकांना आपल्या हक्कांचे बालगृह उपलब्ध करून देत, खर्‍या अर्थाने ही निवारा बालगृहे समाजाला दिशा देत आहेत. जामखेड येथील निवारा बालगृहात आल्यानंतर अ‍ॅड अरूण आबांच्या रुपात अनाथांचा बाप या ठिकाणी मला पहावयास मिळाला. याचा मला खूप मोठा आनंद झाला. असे प्रतिपादन माजी मंत्री आमदार सुरेश धस यांनी केले. ग्रामीण विकास केंद्र संचालित निवारा बालगृह आयोजित निवारा महोत्सव या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.  
यावेळी पोलिस निरीक्षक महेश पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या कार्यक्रमास ऊसतोड कामगाराचा मुलगा नवनिर्वाचित डी. वाय. एस. पी. संतोष खाडे , ग्रामीण विकास केंद्राचे संस्थापक अ‍ॅड. डॉ. अरुण जाधव, जामखेडचे नायब तहसीलदार अनारसे, मंडलाधिकारी नंदकुमार गव्हाणे, कर्जत वृद्ध भूमिहीन संघटनेचे अध्यक्ष शब्बीरभाई पठाण, भोरे मेजेर, अ‍ॅड. हर्षल डोके, संस्थेचे संचालक बापूसाहेब ओहोळ, सचिव उमाताई जाधव, आदी मान्यवर यावेळी विचारपीठावर उपस्थित होते. पुढे बोलताना आ सुरेश धस म्हणाले की, अ‍ॅड. डॉ. अरुण जाधव म्हणजे उपेक्षितांचा आवाज आहेत. अनाथ निराधार मुलांना सांभाळणे हे फार पुण्याचे काम आहे. ग्रामीण विकास केंद्र संस्थेचे काम गोरगरीब कष्टकरी वंचितांसाठी खूप मोठं आहे, अन्याय अत्याचार हे ज्यांनी भोगलं त्यालाच ते दुःख कळत असे सांगून निवारा बालगृह व आईचं घर या दोन्ही प्रकल्पांसाठी आबा तुम्ही सांगेल ती मोठी मदत मी करेल व या संस्थेच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे उभा राहु असा विश्‍वास त्यांनी दिला.
अ‍ॅड. डॉ. अरुण जाधव म्हणाले की, व्यवस्थेने नाकारलेल्या माणसांच्या लढ्याचे नेतृत्व मी करतो. वंचित, निराधार, अनाथ, आदिवासी, भटक्या विमुक्तांच्या मुलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी निवारा बालगृहाची स्थापना केली आहे. आणि समाजातील दानशूर व्यक्तींच्या मदतीवरच हे वसतिगृह चालते. याला शासनाचे कुठलेही अनुदान नाही, असे ते म्हणाले.निवारा बालगृहाचे स्वयंसेवक ज्यांनी या बालगृहाला अन्नधान्य, किराणा, शैक्षणिक साहित्य याची वर्षभरासाठी मदत मिळुन देणारे अभिनेता सचिन चव्हाण (भवरवाडी), सुदाम वायकर (कोपरगाव), लक्ष्मण मंडळे (कोपरगाव), बाळू मंडळे (श्रीगोंदा) यांना सन्मानचिन्ह देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले. यावेळी आदिवासी समाजातील लोकांना जातीचे प्रमाणपत्र, निवारा बालगृहातील मूलामूलींना कपडे व शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर व नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक बापु ओहोळ यांनी तर सुत्रसंचलन संतोष चव्हाण यांनी तसेच आभार वैजीनाथ केसकर यांनी मानले.

COMMENTS