Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

नितेश राणेंचे जयदीप आपटेंसोबत संबंध

ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी दाखवले फोटो

पुणे : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राजकोट किल्ल्यावरील शिवरायांचा पुतळा कोसळल्यानंतर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार शाब्दिक चकमकी घडतांना दिसून ये

निरंजन जाधव यांनी अमेरिकेतून मिळवली पदवी
बोगस वाहन नोंदणी प्रकरणी तीन आरटीओ अधिकार्‍यांसह 9 आरोपींना अटक
दुकानात काम करण्यास नकार दिल्याने युवकास मारहाण

पुणे : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राजकोट किल्ल्यावरील शिवरायांचा पुतळा कोसळल्यानंतर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार शाब्दिक चकमकी घडतांना दिसून येत आहे. छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळ्याचा शिल्पकार जयदीप आपटे हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा माणूस आहे. जयदीप आपटे हा अनुभव नसलेला मूर्तीकार होता. तरीही त्याला शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्याचे काम कसे देण्यात आले? असे प्रश्‍न उपस्थित केले जात असतांनाच शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी नितेश राणे आणि जयदीप आपटे यांचे संबंध असल्याचे फोटोच दाखवल्याने खळबळ उडाली आहे.
यावेळी बोलताना सुषमा अंधारे म्हणाल्या, समितीने पुतळा पाहिला होता का, समितीने पुतळ्याला हिरवा कंदील दाखवला होता, का? समितीने जर हिरवा कंदील दिला होता तर कोण ते विद्वान होते ज्याला पुतळ्याचे शरीर सौष्ठव कळले नाही आणि जर त्यांनी तो हिरवा कंदील दिला नसेल, जर परवानगी दिली नसेल तर तो पुतळा उभा का केला असा सवाल सुषमा अंधारे यांनी उपस्थित केला आहे.  त्याचबरोबर ज्या आपटेबाबत बोलले जाते तो आपटे तो सनातन प्रभातशी संबध आहे, या माणसाची मुलाखत ही यामध्ये दिली आहे, जो माणूस दीड फुटाचा पुतळा उभा करू शकतो त्याला इतके मोठे काम कसे दिले. त्याचे काम दीड फुटापेक्षा कमी उंचीचे पुतळे उभे करणे होते, त्याला इतके मोठे काम कसे दिले गेले, का दिले याच्या खोलात गेलो तेव्हा समजते हा जयदीप आपटे सोबत नितेश राणे दिसत आहेत. जयदीप आपटे आणि नितेश राणे यांचा कोणता दोस्ताना घरी कोण नसताना आहे, हे सांगितले गेले पाहिजे. असा हल्लाबोल अंधारे यांनी केला आहे.

COMMENTS