पुणे प्रतिनिधी - मुंबई पुणे महामार्गावर सध्या गणेशोत्सवामुळे वाहनांची प्रचंड गर्दी आहे. त्याचबरोबर रस्त्यावर सुद्धा ट्रॅफिक सुद्धा अधिक आहे. दरम्यान
पुणे प्रतिनिधी – मुंबई पुणे महामार्गावर सध्या गणेशोत्सवामुळे वाहनांची प्रचंड गर्दी आहे. त्याचबरोबर रस्त्यावर सुद्धा ट्रॅफिक सुद्धा अधिक आहे. दरम्यान नितेश राणे(Nitesh Rane) यांच्या गाडीला अपघात झाला आहे. ज्यावेळी गाडीचा अपघात झाला, त्यावेळी गाडीत त्यांच्यासोबत त्यांची पत्नी, मुलं आणि नातेवाईक होते. हा अपघात उर्से टोल नाका येथे झाला आहे. ट्रकने धडक दिल्याने अपघात झाला आहे. हा अपघात सायंकाळी साडेपाचच्या सुमारास झाला आहे. हा अपघात नॉर्मल असल्यामुळे गाडीतील कोणालाही दुखापत झालेली नाही. या प्रकरणी पिंपरी-चिंचवड पोलिसांनी कर्नाटक मधील ट्रक चालकाला ताब्यात घेतलं आहे.
COMMENTS