इस्लामपूर / प्रतिनिधी : राज्यात राज्यसभेच्या जागा वरून राजकारण सुरू आहे. राज्यातील विधान परिषदेच्या 10 जागांसाठी निवडणूक होणार आहे. यासाठी 10 जून

इस्लामपूर / प्रतिनिधी : राज्यात राज्यसभेच्या जागा वरून राजकारण सुरू आहे. राज्यातील विधान परिषदेच्या 10 जागांसाठी निवडणूक होणार आहे. यासाठी 10 जून पर्यंत उमेदवारी अर्ज दाखल व 20 जूनला मतदान होणार आहे. माजी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांचा कार्यकाल संपत आहे. तरी खोत यांच्या जागेवर इस्लामपूरचे माजी नगराध्यक्ष व भाजपा जिल्हा उपाध्यक्ष निशिकांत पाटील यांची वर्णी लागणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
सन 2019 च्या विधानसभा निवडणुकीत मंत्री जयंत पाटील व माजी नगराध्यक्ष निशिकात पाटील यांच्यात मुख्य लढत झाली होती. या निवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार गौरव नायकवडी यांचा फारसा काही चमत्कार दिसून आला नाही. मात्र, या निवडणुकीत भाजप प्रणित अपक्ष उमेदवार निशिकांत पाटील यांना दोन नंबरची मते मिळाली होती. या निवडणुकीनंतर इस्लामपूर विधानसभा मतदार संघात मंत्री जयंत पाटील विरोधात निशिकांत पाटील असे समीकरण तयार झाले.
भाजपच्या वतीने सदाभाऊ खोत यांना आमदार करून कृषी राज्यमंत्री पद देण्यात आले. शेतकर्यांचे प्रश्न सोडवण्या बरोबर मंत्री जयंत पाटील यांना विरोध करावा, अशी अपेक्षा भाजप नेत्यांची होती. परंतू खोत यांनी मंत्री व आमदार कार्यकाळात कधीही मंत्री जयंत पाटील यांच्या विरोधात बोलले नाहीत. उलट त्यांच्या बरोबर काही कार्यक्रमात मांडीला मांडी लावून बसले दिसले होते. मंत्री जयंत पाटील यांनीही कडकनाथ कोंबडी घोटाळाबद्दल एकही शब्द काढलेला नाही. याचे गुपित काय आहे हा प्रश्न भाजप नेत्यांना पडला आहे.
इस्लामपूर विधानसभा मतदारसंघ हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला म्हणून राज्यभर परिचित आहे. याच राष्ट्रवादी बालेकिल्ल्यात नवखे उमेदवार निशिकांतदादा पाटील यांना दोन नंबरची मते मिळालेली होती. यानंतर इस्लामपूर विधानसभा मतदारसंघात भाजपची ताकद वाढविण्याचे काम त्यांनी सुरू केले. निशिकांत पाटील यांनी प्रत्येक गावात भाजप कार्यकर्त्यांची फळी निर्माण केली आहे. त्यामुळे मंत्री जयंत पाटील यांना विरोध करण्यासाठी निशिकांत पाटील यांच्यासारखा खंबीर नेतृत्व भाजपला शोधूनही सापडणार नाही, अशी चर्चा भाजपच्या वरिष्ठ पातळीवर झाली आहे.
इस्लामपूर मतदारसंघात भाजप पक्ष वाढविणे व कार्यकर्त्यांना ताकद देण्यासाठी भाजपच्या हालचाली सुरू आहेत. मंत्री जयंत पाटील यांच्याबरोबर निशिकांत पाटील यांचा सुरू असलेला संघर्ष महाराष्ट्र पाहत आहे. मंत्री पाटील हे राज्यात भाजपच्या विरोधात आहेत आणि मंत्री पाटील यांच्या विरोधात निशिकांत पाटील काम करत आहेत. यांच कामाची भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी दखल घेतली आहे. त्यामुळे विधान परिषदेत निशिकांत पाटील यांची वर्णी लागण्याची शक्यता नाकारता येत नाही.
ऐकीत बेकी….जयंतरावांचेच षठयंत्र….
मंत्री जयंत पाटील नेहमी बेरजेचे राजकारण करत आले आहेत. विरोधकांतील काही मासे अलगत जयंतरावांच्या गळाला ऐन निवडणुकीच्या तोंडावर पडद्या आडून लागतात आणि विरोधकांच्यात बंडखोरी होते. एकास एक लढती ऐवजी विरोधकांच्यात फुट पाडून एकाचे दोन उमेदवार होतात आणि जयंत पाटील यांचा राजकीय मार्ग सुकर होतो. हा अनुभव मागील अनेक निवडणुकीत आला आहे. राष्ट्रवादी विरोधकातील काही फितूर ऐनवेळी टांगा पलटी करत असल्याची चर्चा संपुर्ण मतदार संघात आहे. भाजपाने यावर चिंतन करुन ग्रांऊड रिपोर्ट घेणे आवश्यक आहे. निशिकांत पाटील व जयंत पाटील यांच्यातील संघर्ष संपुर्ण महाराष्ट्र पहात आहे. राजकीय बरोबर निशिकांत पाटील संस्थात्मक अडचणीत आणण्यासाठी विरोधक प्रयत्नशील असल्याची ही चर्चा आहे. यावर वरिष्ठ भाजपा विचार व चिंतन करणार का? निशिकांत पाटील हेच एकमुखी नेतृत्व जयंत पाटील यांचे प्रस्थापीत राजकारण संघर्षातून मोडून काढेल, अशी अपेक्षा भाजपच्या काही नेत्यांना आहे. यासाठी भाजपा वरीष्ठ नेत्यांनी विधान परिषदेसाठी निशिकांत पाटील यांचा विचार करणे आवश्यक असल्याची चर्चा भाजपा समर्थकाच्यात आहे.
COMMENTS