Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

निशिकांत भोसले-पाटील यांनी सहकुटुंब बजावला मतदानाचा हक्क

इस्लामपूर : महायुतीचे उमेदवार निशिकांत भोसले-पाटील यांनी सहकुटुंब मतदानाचा हक्क बजावला. इस्लामपूर / प्रतिनिधी : इस्लामपूर विधानसभा मतदार संघाचे

पराजयाच्या भीतीने विद्यमान आमदारांच्या पोटात गोळा : निशिकांत भोसले-पाटील
शिरवडेत कृष्णा पात्रात शाळकरी मुलाचा पाण्यात बुडून मृत्यू
राजकारणात सक्रिय होण्याचा विचार नाही : श्री. छ. वृषालीराजे भोसले

इस्लामपूर / प्रतिनिधी : इस्लामपूर विधानसभा मतदार संघाचे महायुतीचे उमेदवार निशिकांत भोसले-पाटील यांनी बुधवारी सकाळी इस्लामपूर येथील शाळा क्र. एक येथे सहकुटुंब सोबत जाऊन आपला मतदानाचा हक्क बजावला. सदृढ लोकशाहीसाठी सर्वांनी घराबाहेर निघून मतदान करावे, असे आवाहन यावेळी निशिकांत भोसले-पाटील यांनी केले.
यावेळी त्यांच्या सोबत आई शशिकला भोसले-पाटील, पत्नी सुनीता भोसले-पाटील, कन्या प्रांजली भोसले-पाटील, चि. प्रत्युष भोसले-पाटील उपस्थित होते.
निशिकांत भोसले-पाटील म्हणाले, विधानसभा निवडणुकीत राज्यात महायुतीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा राज्यात महायुतीचे सरकार येईल. इस्लामपूर मतदार संघात मतदारांना बदल हवा आहे. त्यादृष्टीने गावो-गावातून परिवर्तनासाठी उठाव झाला आहे. प्रत्येकाच्यातील उत्स्फुर्तपणा व ऊर्जा विजयापर्यंत पोहचवेल. महायुतीतील घटक पक्षाच्या सर्व पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी विजयासाठी प्रामाणिक प्रयत्न केले आहेत. त्यामुळे मोठ्या मताधिक्यांनी आमचा विजय होईल, असा मला विश्‍वास आहे.

COMMENTS