Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

निसर्ग गार्डन कात्रजची बैलगाडी ठरली बाबाराजे जावळी केसरीची मानकरी

कोलेवाडी : बाबाराजे जावळी केसरी बैलगाडी शर्यत स्पर्धेतील एक चुरशीचा क्षण. कुडाळ / वार्ताहर : जावळी तालुक्यातील कोलेवाडी येथे बुधवारी बाबाराजे जावळ

विधानसभा निवडणूकीसाठी यंत्रणानी सज्ज रहावे : जितेंद्र डुडी
गृह भेटीद्वारे वाई मतदार संघात वृध्दांसह दिव्यांग 139 मतदारांनी बजावला मतदानाचा हक्क
सांगवड पुलाजवळ भीषण अपघात; 3 ठार, 2 गंभीर

कुडाळ / वार्ताहर : जावळी तालुक्यातील कोलेवाडी येथे बुधवारी बाबाराजे जावळी केसरी 2022 राज्यस्तरीय बैलगाडा शर्यती मोठ्या उत्साहात झाल्या. हजारोंच्या संख्येने उपस्थित जनसमुदयासमोर रंगलेल्या या शर्यतीच्या मैदानात कात्रजची निसर्ग गार्डन बैलगाडी बाबाराजे जावळी केसरी 2022 मानकरी ठरली.
आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या वाढदिवसानिमित्त या भव्य बैलगाडी शर्यतीचे आयोजन करण्यात आले होते. सायंकाळपर्यंत चाललेल्या या शर्यतीला आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, जिल्हा पतिषदेचे माजी उपाध्यक्ष वसंतराव मानकुमरे, जिल्हा बँकेचे संचालक ज्ञानदेव रांजणे, मेढ्याचे नगराध्यक्ष पांडुरंग जवळ, कांतिभाई देशमुख, हणमंतराव पार्टे, मच्छिंद्र क्षीरसागर, राजू भोसले, अर्चनाताई रांजणे, विजय सुतार, जयदीप शिंदे, सागर धनावडे, समीर आतार, जावळी बँकेचे संचालक शिवाजी नवसरे यांच्यासह मान्यवर व बैलगाडी शौकीन उपस्थित होते.
जावळी तसेच शेजारील तालुक्यातील हजारोंच्या संख्येने प्रेक्षक याठिकणी उपस्थित होते. शर्यतीत सुमारे 160 पेक्षाही अधिक बैलगाड्यांनी सहभाग नोंदविला होता. एकूण 28 गटांतून मैदानावर कोणताही अनुसूचित प्रकार न घडता स्पर्धा शांततेत पार पडल्या. याठिकाणी हलगीच्या निनदाने मैदानावर जोश भरला होता. यास्पर्धेत कात्रजची निसर्ग गार्डन बैलगाडी प्रथम क्रमांक, महाराष्ट्र केसरी गरुड ग्रुप चिंचनेर द्वितीय, संदिपशेठ तोडकर कुडाळ तृतीय, खाशाबा दाजी शिंदे सैदापूर कराड चतुर्थ, जय भैरवनाथ प्रसन्न आखाडे पाचवा तर गुंडा पवार नांदवळ सहावा क्रमांक मिळाला आहे. यावेळी बैलगाडा चालकाचे कौशल्य, उत्साहाचे उपस्थितांकडून कौतुक होत होते.
जावळी तालुक्यात प्रथमच एवढ्या मोठ्या प्रमाणावर भरलेल्या या मैदानाला प्रेक्षकांनी उत्स्फूर्त दिला. गेली काही वर्षांपासून आशा शर्यतींना बंदी होती. मात्र, सर्वोच्च न्यायालयाच्या परवानगीने महाराष्ट्रात पुन्हा एकदा बैलगाडी शर्यती सुरू झाल्या आहेत. यामुळेच कोलेवाडीच्या या मैदानात समस्त जावळीकरांनी या शर्यतींचा थरार अनुभवायला मिळाला. स्पर्धा संयोजनासाठी कोलेवाडी ग्रामस्थ तसेच संयोजन समिती यांचे मोलाचे सहकार्य मिळाले.शिवाजी शिवणकर यांनी समालोचन केले.

याप्रसंगी नुकताच महाराष्ट्र केसरी ठरलेला पै. पृथ्वीराज पाटील यांना आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या वतीने घोषित करण्यात आलेले 5 लाखांचे रोख बक्षीस देण्यात आले. तसेच जावळीकरांच्या वतीने त्याचा विशेष सत्कार करण्यात आला.

COMMENTS