Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

निपाणी-निमगाव ते वाटापूर रस्त्याच्या कामाला सुरूवात

ग्रामस्थांच्या उपोषण आंदोलनास अखेर यश

नेवासा फाटा : गेल्या पाच दिवसांपासून तामसवाडी येथे निपाणी निमगाव ते वाटापुर या रस्त्याचे काम सुरु करण्यात यावे यासाठी  उपोषण आंदोलन सुरू करण्यात

नगर अर्बनचे बनावट सोनेतारण गाजण्याची चिन्हे ; बचाव कृती समिती आक्रमक पवित्र्यात
कोपरगावमध्ये दोन वर्षानंतर फुलणार ‘गोदाकाठ महोत्सव’
आगाऊ पिकविमा भरपाई द्याः आ. काळे यांची कृषीमंत्र्यांकडे मागणी

नेवासा फाटा : गेल्या पाच दिवसांपासून तामसवाडी येथे निपाणी निमगाव ते वाटापुर या रस्त्याचे काम सुरु करण्यात यावे यासाठी  उपोषण आंदोलन सुरू करण्यात आले होते. आज प्रत्यक्ष रस्ता कामास प्रारंभ करण्यात आला. त्यामुळे ग्रामस्थांच्या उपोषण आंदोलनास यश मिळाले. या यशामुळे ग्रामस्थांकडून आंदोलनकर्ते व या आंदोलनास सहकार्य करनार्‍या सर्वांचे अभिनंदन करत सर्वांचा सत्कार कार्यक्रम घेण्यात आला.
जवळ-जवळ सहा कोटी खर्चाचे अंदाजपत्रक असणार्‍या निपाणी निमगाव ते वाटापुर या रस्त्याचे अर्धवट काम गेल्या आठ वर्षांपासून रखडले होते. या अर्धवट कामामुळे चार गावातील नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला. यामुळे चारही गावातील संतप्त नागरिकांनी तामसवाडी गावातील हनुमान मंदीरात आमरण उपोषणाला सुरुवात केली होती. जोपर्यंत रस्त्याचे काम सुरु केले जाणार नाही तोपर्यंत आंदोलनं सुरूच राहणार अशी ठाम भूमिका ग्रामस्थानी घेतली होती. आज सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता यांनी स्वतः आंदोलनस्थळी भेट देवून माहिती घेत सदर कामास त्वरित मुदत वाढवून घेत ठेकेदारास त्वरित कामास प्रारंभ करण्याच्या सूचना केल्या यानुसार आज रस्त्याच्या कामास सुरुवात करण्यात आली. यामुळे पाच दिवसांपासून सूरू असलेल्या आंदोलनास यश मिळाले व आंदोलन सोडविण्यात आले. यावेळी ग्रामस्थांनी आंदोलनकर्ते संजय कोलते,सारंगधर फोफसे व यात मोलाचा सहभाग असणारे संभाजी माळवदे, संतोष काळे यांचा सन्मान केला. यावेळी संभाजी माळवदे यांनी प्रत्येक गावातील नागरिकांनी गावातील एखादे विकास काम सुरु असताना सतर्क राहून ते काम करून घ्यावे व निकृष्ट दर्जाचे काम केल्यास आवाज उठवल्यास भ्रष्ट्राचार नक्कीच बंद होईल असे स्पष्ट केले. संजय कोलते यांनी हा विजय माझा नसून हा गावातील नागरिकांचा विजय आहे. संतोष काळे यांनी गावातील कुठलीही समस्या सोडविण्यासाठी आम्ही ग्रामस्थांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहू असे स्पष्ट केले. यावेळी
संभाजी जगताप, वैजनाथ जाधव, बाबा फोफसे, रमेश कोलते, दत्ता कर्जुले, भाऊसाहेब जाधव, जालिंदर कर्जुले, महेश कर्जुले, गोवर्धन आयनार, भास्कर मोटे, पपू गोसावी, संजय गांधी, शंकर कर्जुले, आप्पा आयनार, शिवाजी जगताप आदींसह तामसवाडी, वाटापूर येथील ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी सारंगधर फोफसे यांनी उपस्थित सर्व ग्रामस्थांचे आभार मानले.

COMMENTS