Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पवनक्क्यांचे साहित्य चोरणारे नऊजणांना अटक

कराड / प्रतिनिधी : भुदरगड तालुक्यातील बंद पवनचक्क्यांचे तब्बल 68 लाखांचे साहित्य चोरत असताना नऊजणांच्या टोळीला पोलिसांनी गजाआड केले. त्या टोळीत जिल्ह

आसमानी  संकटापुढे बळीराजा हतबल 
काळुंद्रे-खराळे-चिंचेवाडी उपसा सिंचन योजनेसाठी संपादीत जमिनींचा मोबदला कधी? ग्रामस्थांचा संतप्त सवाल
फलटणमध्ये ऊसाच्या ट्रॉलीच्या अपघाताची चित्रफीत सोशल मिडियावर व्हायरल

कराड / प्रतिनिधी : भुदरगड तालुक्यातील बंद पवनचक्क्यांचे तब्बल 68 लाखांचे साहित्य चोरत असताना नऊजणांच्या टोळीला पोलिसांनी गजाआड केले. त्या टोळीत जिल्ह्यातील तारळे येथील दोघे तर सातार्‍यातील एकाचा समावेश आहे. टोळीची साखळी सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर जिल्ह्यांसह बिहारपर्यंत असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. पवनचक्क्यांच्या साहित्याशिवाय संशयितांकडून वाहन, मोबाईलसह 1 कोटी 30 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यास पोलिसांना यश आले.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, जकीनपेठ येथे म्हातारीचे पठार आहे. त्या पठारावर काही पवनचक्क्या बंद स्थितीत आहेत. त्या पवनचक्क्यांचे साहित्य चोरीस गेल्याच्या तक्रारी पोलिसांकडे आल्या होत्या. त्यानुसार पोलिसांनी थेट कारवाई करत पवनचक्कीचे 68 लाखांचे साहित्य चोरून नेताना नऊजणांना अटक केली. त्यात तारळेतील दोघे, तर सातारा शहरातील एकाचा समावेश आहे. प्रशांत जाधव, संतोष जाधव (दोघे रा. तारळे, ता. पाटण), तानाजी एकनाथ पवार (रा. मंगळवार पेठ, सातारा) अशी त्यांची नावे आहेत. टोळीत दोघेजण परप्रांतीय आहेत. टोळीतील अन्य संशयितांची नावे : उत्तम कारंडे (रा. कोळा, ता. सांगोला), मच्छिंद्र हेपलकर (रा. जत), संतोष ढेरे (रा. ढेरेवाडी, ता. राधानगरी), प्रफुल्ल शर्मा (रा. गापाळगंज, बिहार, सध्या रा. बिद्री, ता. कागल), निहाज अन्सारी (रा. गोरखपूर कुशीनगर, उत्तर प्रदेश, सध्या रा. चंद्रे, ता. राधानगरी), अक्षय चौगुले (रा. खेबवडे, ता. करवीर). पोलिसांनी त्यांच्याकडून वाहन, मोबाईल असा सुमारे तीन कोटी रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला. त्यांच्याकडून अद्यापही काही नावे निष्पन्न होण्याची शक्यात पोलीस निरीक्षक मोरे यांनी व्यक्त केली आहे.
जकीनपेठ येथील पठारावर मारुती विंड कंपनीच्या पवनचक्की बंद स्थितीत आहेत. त्या ठिकाणचे साहित्य चोरून नेण्यासाठी रात्री उशिरा तेथे आले होते. पवनचक्कीचे मौल्यवान मिश्रधातूचे अवजड पार्ट गॅस कटरने कापले. कापलेले साहित्य क्रेनच्या मदतीने कंटेनरमध्ये भरले होते. याची टीप पोलिसांना मिळाली होती. पोलिसांनी तेथे छापा टाकून चोरी करतानाच चोरट्यांना रंगेहात पकडले. त्यात पवनचक्कीचे महागडे साहित्य जप्त झाले आहे. कापलेले मिश्रधातूचे 34 टन वजनाचे सुट्टे पार्ट पोलिसांनी जप्त केले आहेत. त्याची किंमत 68 लाख रुपये आहे. पोलिसांनी कारवाईत दोन कंटेनर, दोन हायड्रो क्रेन, एक कार, दुचाकीसह पाच छोटे-मोठे गॅस सिलिंडर, गॅस फ्लेम कटर व पाईपसह आठ मोबाईलचे संच असे सुमारे 1 कोटी 30 लाखांचे साहित्य जप्त केले.

COMMENTS