आम आदमी पार्टीचे संस्थापक नेते आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या निवासस्थानी आज भाजयुमो चे राष्ट्रीय अध्यक्ष तथा दक्षिण बंगलोर चे खास
आम आदमी पार्टीचे संस्थापक नेते आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या निवासस्थानी आज भाजयुमो चे राष्ट्रीय अध्यक्ष तथा दक्षिण बंगलोर चे खासदार तेजस्वी सुर्या यांच्या नेतृत्वाखाली हिंसक आंदोलन करण्यात आले. हे आंदोलन काश्मिरी पंडितांवर कसे हल्ले झाले, याचे निदर्शक असल्याचे स्वतः तेजस्वी सुर्या यांनी म्हटले आहे; याचाच अर्थ हे आंदोलन हिंसाचाराचे एक प्रतीकात्मक आंदोलन असल्याची अप्रत्यक्ष कबुलीच आंदोलनकर्त्यांनी दिली आहे. अर्थात लोकशाही व्यवस्थेमध्ये अशा हिंसक आणि सर्वसामान्य जनतेला चिथावणी मिळेल, अशा प्रकारच्या हिंसक कारवाईचा सर्वप्रथम निषेधच करायला हवा. या हिंसक आंदोलनाच्या संदर्भात दोन गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत त्या याठिकाणी उल्लेखित करणे किंबहुना त्या संदर्भात स्पष्टीकरण करणे हे एकूणच देशाच्या सामाजिक राजकीय जीवनासाठी आवश्यक वाटते. ज्याप्रमाणे एकाच संघटनेचे दोन भाग निर्माण झाले तर दोन्ही गट एकमेकांच्या विरोधात ठाकतात. कोणत्याही संघटनेची दोन गट किंवा अपत्य म्हणून अलीकडे मोठ्या प्रमाणात चर्चा होते त्यातील भारतीय जनता पक्ष हे आता उघड सत्य आहे तर आम आदमी पक्षावर देखील ते संघाचे हस्तक असल्याचा आरोप अधूनमधून होत असतात. आम आदमी पक्ष हा सध्या दिल्ली आणि पंजाब मध्ये सत्तेत येऊन काही काळानंतर राष्ट्रीय पक्ष होण्याच्या तयारीत पोचला आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात देशव्यापी स्पर्धक म्हणून आम आदमी पक्ष उभा राहत असेल तर त्याला आत्ताच तीव्र विरोध करायला हवा, अशा प्रकारची एक स्ट्रॅटेजी भारतीय जनता पक्षाच्या अंतर्गत तयार झाली असावी. या स्ट्रॅटेजी ला प्रत्यक्ष अंमलबजावणीत आणण्याचा व्यवहार म्हणजे तेजस्वी सुर्या यांच्या नेतृत्वाखाली दिल्ली मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर झालेले हिंसक आंदोलन याचा एक मासलेवाईक नमुना आहे, ही पहिली बाब. तर, दुसरी म्हणजे, आर एस एस के डी राजकीय पातळीवर कोणताही ब्राम्हण नेता नाही त्यामुळे आगामी काळात जाहीर नेत्याला राष्ट्रीय पातळीवर उभे करण्याची स्ट्रॅटेजी आखली जाईल, त्या नेत्याकडे अशा प्रकारची आंदोलने सोपवण्याची प्रक्रिया आता आर एस एस ने सुरू केली आहे, असे म्हणतानाच ही प्रक्रिया सुरू करताना आधुनिक काळात असणारा वा तंत्रज्ञानाचा पसारा व त्याला समजून घेणारे व्यक्तिमत्व आणि त्याच वेळी त्या व्यक्तिमत्त्वाला कायद्याच्या परिभाषेत उभे करून देशात लोकशाही पद्धतीच्या नावाखाली हिंसक आंदोलनाची नवी प्रक्रिया पुढे करण्याचे राजकारण आता उदयाला येत आहे. तेजस्वी सुर्या अशा या प्रक्रियेचे द्योतक नाव म्हणून यापुढेही विचारात घ्यावे लागेल. थोडक्यात सांगायचे झाल्यास २०१४ नंतर देशात केवळ सत्ताकारण बदलले असे नाही, तर एकूणच राजकीय प्रक्रिया आणि त्या प्रक्रियेत समाविष्ट होणाऱ्या राजकीय पक्षांचे राजकारण उजव्या अंगाने किंवा विचारांनी पुढे नेण्यासाठी देशात जी प्रक्रिया सुरू झालेली आहे त्या प्रक्रियेचा एक भाग म्हणजे आजचे अरविंद केजरीवाल यांच्या निवासस्थानासमोर चे आंदोलन आहे. द कश्मीर फाइल्स हा चित्रपट ज्या काश्मिरी पंडितांच्या जीवनावर आधारलेला आहे, त्याच काश्मिरी पंडितांच्या काही प्रतिनिधींनी या चित्रपटातील ७५ टक्के भाग हा अवास्तव किंवा खोटा असल्याचा आरोप केला आहे. या चित्रपटाला देशभरात टॅक्स फ्री करावा असं आंदोलनच भाजपाने एक प्रकारे चालवला आहे अशावेळी देशा सर्वाधिक ताकद वर किंवा सशक्त म्हणता येईल असा युक्तिवाद एक काश्मीर फाईल या चित्रपटाच्या टॅक्स फ्री विरोधात बोलताना अरविंद केजरीवाल यांनी केला काश्मीर फाईल चित्रपटावर बोलताना त्यांचे भाषण हा देशात चर्चेचा विषय ठरल्यामुळे भाजपाचा अंतस्थ भाग हा फार मोठ्या प्रमाणात दुखावला गेला आहे. त्यामुळे भारतीय जनता पक्षाच्या युवा शाखेकडून थेट राष्ट्रीय अध्यक्षाला आंदोलनात सामील व्हावे लागले. अर्थात तेजस्वी सुर्या हे नाव खरे तर आरएसएसचे प्रचारक म्हणूनच अधिक कार्यरत राहिलेले आहे. अगदी वयाच्या नवव्या वर्षापासून सूर्या यांची कृती ही प्रो आरएसएस राहिलेली आहे. त्यामुळे त्यांच्या घरातील वातावरण पूर्णपणे आरएसएसच्या ध्येय धोरणाशी संलग्न आहे. त्यांच्या नेतृत्वातून देशाचे आगामी राजकारण कशा पद्धतीने पुढे न्यायचे याची केवळ झलकच नव्हे तर लोकशाहीच्या नावाखाली देशात सत्ताकारण कसे उभे राहील याची रंगित तालिम आहे. संवैधानिक लोकशाहीशी विसंगत असणारे सत्ताकारण उभे करून लोकशाहीचा आभास निर्माण करणारे हे राजकारण आगामी काळाचा आगाज ठरेल!
COMMENTS