निळवंडेचे पाणी शिर्डी व कोपरगाव शहरांना देऊ नये ; भंडारदरा लाभक्षेत्र पाणी समितीचे मुख्यमंत्र्यांना पत्र

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

निळवंडेचे पाणी शिर्डी व कोपरगाव शहरांना देऊ नये ; भंडारदरा लाभक्षेत्र पाणी समितीचे मुख्यमंत्र्यांना पत्र

अहमदनगर/प्रतिनिधी : निळवंडे धरणाचे पाणी शिर्डी व कोपरगाव शहरांसाठी देण्यात येऊ नये, अशी मागणी भंडारदरा लाभक्षेत्र पाणी समितीच्या सदस्यांनी केली असून,

नव्या सरकारमध्ये नगरमधून कोणाला मंत्रीपदाची लॉटरी?
जनार्दन स्वामी महाराजांचे आशीर्वाद कायम – आमदार आशुतोष काळे
सांदिपनी अकॅडमीने वंचित घटकातील विद्यार्थ्यांच्या अंगणात लावला आनंदाचा दिवा

अहमदनगर/प्रतिनिधी : निळवंडे धरणाचे पाणी शिर्डी व कोपरगाव शहरांसाठी देण्यात येऊ नये, अशी मागणी भंडारदरा लाभक्षेत्र पाणी समितीच्या सदस्यांनी केली असून, तसे पत्र त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठवले आहे. निळवंडे धरणातून बंदिस्त पाईपलाईनद्वारे शहराला रोज मिळणार्‍या स्वच्छ व शुद्ध सरासरी 1 कोटी 33 लाख लिटर पाण्यावर हक्क सोडायचा का..? असा सवाल करणारे फ्लेक्स बोर्ड कोपरगाव पाणी जनआंदोलन समितीच्या नावाने कोपरगाव परिसरात झळकले आहेत. या पार्श्‍वभूमीवर भंडारदरा लाभक्षेत्र पाणी समितीचे (श्रीरामपूर, राहुरी, राहाता व नेवासा तालुका) सदस्य सुरेश पांडुरंग ताके ,जितेंद्र भोसले, रामचंद्र पटारे, भरत आसने, दिलीप गलांडे, किशोर पाटील, ईश्‍वर दरंदले, संदीप गवारे, महेश लवांडे, रावसाहेब गलांडे, संजय नाईक व अन्य सदस्यांनी यावर आक्षेप घेताना मुख्यमंत्री ठाकरे यांना पत्र पाठवले आहे. या पत्राच्या प्रती उपमुख्यमंत्री, जलसंपदा मंत्री व पाणीपुरवठा मंत्र्यांनाही पाठवण्यात आल्या आहेत.

लाभक्षेत्रातच नाही
या पत्रात म्हटले आहे की, शिर्डी व कोपरगाव शहरांना पिण्यासाठी निळवंडे धरणामधून पाणी पुरवठा करण्यासंदर्भात अधूनमधून मागणी होत असते. स्थानिक वर्तमानपत्रात यासंदर्भात चर्चा आहे. पण, शिर्डी व कोपरगाव ही दोनही शहरे निळवंडे लाभक्षेत्रातील नसून दारणा धरणाच्या लाभक्षेत्रातील आहेत. दारणा धरण हे 95% विश्‍वासार्हता असलेले धरण आहे तसेच या धरणात शिर्डी व कोपरगाव शहरांसाठी पाणी राखीव आहे. या धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील पर्जन्यमानाच्या तुलनेत धरणाचा पाणीसाठा खूप कमी आहे. त्यामुळे हे धरण लवकर भरुन ओव्हरफ्लो होत असते म्हणून तत्कालीन ब्रिटिश सरकारने दारणाच्या उजव्या कालव्यावर 0.75 टीएमसीचा पुच्छ तलाव (टेलटँक) चितळी ता. राहाता येथे प्रस्तावित केला होता, परंतु तो झालेला नाही. हा तलाव करुन दोन्ही शहरांचा व परिसराचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न सुटू शकतो, असा दावा यात करण्यात आला आहे. निळवंडे धरण हे 50% विश्‍वासार्हतेचे असून निळवंडे धरणाचे पाणलोट क्षेत्र हे कमी पावसाचे आहे. त्यामुळे शिर्डी व कोपरगावला पिण्यासाठी शाश्‍वत पाणी पुरवठा दारणा धरणातून शक्य आहे. त्यामुळे आम्ही भंडारदरा लाभक्षेत्र पाणी समितीचे सर्व सदस्य गोदावरीसारख्या मोठ्या नदीच्या खोर्‍यात छोटी उपनदी असलेल्या प्रवरेतून पाणी देण्यास या पत्राद्वारे तीव्र विरोध करीत आहोत, असे या पत्रात स्पष्ट केले गेले आहे.

COMMENTS