Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

वीरभद्र ट्रस्टच्या अध्यक्षपदी निधाने तर, उपाध्यक्षपदी बोठे

शिर्डी/प्रतिनिधी ः येथील वीरभद्र (बिरोबा) सार्वजनिक देवालय ट्रस्टच्या अध्यक्षपदी साहेबराव निधाने तर उपाध्यक्षपदी सचिन बोठे यांची सर्वानुमते निवड

जी-20 चे प्रतिनिधित्व भारताच्या विकासाला बळकटी देणारे – प्रा. डॉ. हर्षा गोयल
Kopargaon : तरुणाची लोखंडी रॉडने व दगडाने ठेचून केली हत्या | LOKNews24
संगमनेरमध्ये श्रीराम नवमी उत्सव उत्साहात

शिर्डी/प्रतिनिधी ः येथील वीरभद्र (बिरोबा) सार्वजनिक देवालय ट्रस्टच्या अध्यक्षपदी साहेबराव निधाने तर उपाध्यक्षपदी सचिन बोठे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे. राहाता येथील नवसाला पावणारे देवता म्हणून ख्याती असलेल्या वीरभद्र (बिरोबा) ट्रकच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाची निवड प्रक्रिया सोमवारी सकाळी 10 वाजता ट्रस्टचे अध्यक्ष सागर सदाफळ यांच्या अध्यक्षतेखाली त्याच्या कार्यालया मध्ये संपन्न झाली.


या ट्रस्टमध्ये माळी, धनगर, मराठा या 3 समाजातील प्रत्येकी 5 असे एकूण 15 विश्‍वस्तांची निवड प्रत्येक 5 वर्षांनी करण्यात येते.मागील विश्‍वस्त मंडळाची मुदत काही दिवसापूर्वी संपल्यानंतर नोव्हेंबर महिन्यात ग्रामसभेच्या माध्यमातून 15 नवीन विश्‍वासांची निवड करण्यात आली. तसेच सोमवारी अध्यक्ष व उपाध्यक्ष तसेच खजिनदार यांची निवड प्रक्रिया शांततेत संपन्न झाली. वीरभद्र ट्रस्टच्या अध्यक्षपदी राहाता नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष साहेबराव निधाने यांची तर उपाध्यक्ष पदी प्रगतशील शेतकरी सचिन बोठे व खजिनदार पदी ट्रस्टचे माजी उपाध्यक्ष  राजेंद्र गायकवाड या सर्वानुमते  विश्‍वस्त मंडळाच्या बैठकीत निवड करण्यात आली. निवड प्रक्रियेच्या बैठकीत प्रवीण सदाफळ , विजय सदाफळ डॉ. सुरेश बोठे, चांगदेव गाडेकर ,मिलिंद गाडेकर, ज्ञानेश्‍वर गाडेकर, निवृत्ती बनकर, चांगदेव गिधाड ,जबाजी मेचे, रावसाहेब घुमसे, दिलीप वाघ वीरभद्र देवस्थानचे पुजारी सर्जेराव भगत सेक्रेटरी अरविंद गाडेकर उपस्थित होते.  निवडीनंतर नवनिर्वाचित पदाधिकार्‍यांचा सन्मान ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आला त्याप्रसंगी  मुकुंदराव सदाफळ, अँड रघुनाथ बोठे, नानासाहेब बोठे, सभापती भाऊसाहेब जेजुरकर, भास्करराव सदाफळ, मोहनराव सदाफळ , धनंजय गाडेकर,भागुनाथ गाडेकर, सुरेश गाडेकर, माजी नगराध्यक्ष कैलास सदाफळ, भानुदास बोठे, बाळासाहेब बोठे, अंबादास गाडेकर, सुनील बोरकर, सुभाष सदाफळ, माजी चेअरमन स्वप्निल गाडेकर, सुनील सदाफळ,अँड विजय बोरकर, चंद्रभान मेहेत्रे, गणेश बोरकर, संतोष बोरकर, जगन्नाथ सदाफळ, शिवाजी आनप, डॉ महेश गव्हाणे , अण्णा लांडबिले, समता परिषदेचे अध्यक्ष संतोष लोंढे, चेतन गाडेकर, अनिल बोंठे, प्रदीप कोल्हे, सावता माळी ट्रस्टचे अध्यक्ष दिलीप गाडेकर, मच्छिंद्र बनकर, ज्ञानेश्‍वर गाडेकर, राधाकिसन भुजबळ, दत्ता गाडेकर सचिन मेहेत्रे, अमोल गाडेकर, अँड पंडित गारेकर, सुभाष चौधरी, सोमनाथ भगत,  वीरेश बोठे सुधाकर कुंभकर्ण, पांडुरंग तुपे, राजेंद्र अग्रवाल यांच्यासह शहरातील ग्रामस्थांनी नवनिर्वाचित पदाधिकारी यांचा सत्कार केला. अध्यक्ष पदाची निवड झाल्यानंतर निधाने यांच्या मित्र परिवाराने फटाक्यांची आतिश बाजी करत आनंद उत्सव साजरा केला.

COMMENTS