Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

एनआयएची नागपुरात छापेमारी

नागपूर : दिल्लीहून आलेल्या एनआयएच्या पथकाने गुरुवारी नागपुरात दोन ठिकाणी छापेमारी केली. यावेळी तपास संस्थेने तीन जणांची चौकशी केली. स्थानिक सतरंज

साताऱ्यात भूकंपाचे सौम्य धक्के
पोलिस भरतीचा अर्ज भरण्यास मुदतवाढ
मांगरूळ येथील मैदानात पै. सिकंदर शेखची बाजी; चिंचेश्‍वर यात्रेनिमित्त कुस्ती मैदान पडले पार

नागपूर : दिल्लीहून आलेल्या एनआयएच्या पथकाने गुरुवारी नागपुरात दोन ठिकाणी छापेमारी केली. यावेळी तपास संस्थेने तीन जणांची चौकशी केली. स्थानिक सतरंजीपुरा आणि कोतवाली पोलिस ठाण्यांच्या हद्दीत ही कारवाई करण्यात आली.
यिासंदर्भातील माहितीनुसार गुरुवारी पहाटे 4 वाजेच्या सुमारास एनआयचे दिल्लीतून आलेले 20 जणांचे पथक नागपुरातील सतरंजीपुरा परिसरातील बडी मशीद परिसरात दाखल झाले. त्यांनी गुलाम मुस्तफा नावाच्या व्यक्तीचा शोध सुरु केला. तो याच बडी मशीद परिसरात भाड्याने राहत असल्याची माहिती एनआयएला मिळाली होती.  गुलाम मुस्तफा हा जमात ए रजा मुस्तफा या संघटनेच्या माध्यमातून काहीतरी देश विघातक कारवाई करत असल्याची माहिती एनआयएकडे होती. यासोबतच बडी मशीद परिसरात अहमद रझा वल्द मोह आणि अख्तर रझा वल्द मोह नावाच्या दोघांचीही देखील केली. या छाप्यादरम्यान नागपूर पोलिसांच्या गुन्हे शाखेचे अधिकारी-कर्मचारी देखील हजर होते. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी परिसरात कडेकोट सुरक्षा तैनात करण्यात आली होती. एनआयएची कारवाई सुमारे 4 तास चालली. एनआयएचे पथक सकाळी 8 वाजेपर्यंत शोध घेत होते. सध्या दोघांना नोटीस देऊन पथक परतले आहे. एनआयएने या छापेमारीबाबत अधिकृत माहिती दिलेली नाही. शोध मोहिमेदरम्यान मोठा पोलीस बंदोबस्त या ठिकाणी तैनात करण्यात आला होता.

COMMENTS