Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

राज्यात पुढील चार दिवस पावसाचे  

पुण्यात ऑरेंज तर मुंबई, पालघर, ठाण्यात यलो अलर्ट

मुंबई ः राज्यात मान्सून सक्रिय होवून बर्‍याच दिवसांचा कालावधी लोटला असला तरी अनेक जिल्ह्यात पाऊस नसल्याने पेरण्या रखडल्या आहेत. तर अनेक जिल्ह्यात

माण तालुक्यात अवैध वाळू उपसा; 17 लाख 45 हजाराचा मुद्देमाल जप्त
पावसाळ्यात जीवित व वित्तहानी होणार नाही याची खबरदारी घ्यावी : ना. बाळासाहेब पाटील
खास एफसी या ५ बटाटा वाणाचे पेटंट रद्द | LOKNews24

मुंबई ः राज्यात मान्सून सक्रिय होवून बर्‍याच दिवसांचा कालावधी लोटला असला तरी अनेक जिल्ह्यात पाऊस नसल्याने पेरण्या रखडल्या आहेत. तर अनेक जिल्ह्यात पेरण्या पूर्ण झाल्या असून शेतकरी पावसांची वाट पाहतांना दिसून येत आहे. अशावेळी हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार पुढील चार दिवस राज्यात जोरदार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे.
विदर्भातील बुलडाणा, अकोला, अमरावती, वाशीम, वर्धा, यवतमाळ, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यांत वादळी पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे. बंगालच्या उपसागरातील चक्राकार वार्‍यांच्या प्रभावामुळे ओडिशा आणि पश्‍चिम बंगालच्या किनार्‍यालगतच्या समुद्रात हवेचे कमी दाबाचे क्षेत्र कायम आहे. त्याला लागूनच समुद्र सपाटीपासून 7.6 किलोमीटर उंचीवर चक्राकार वारे वाहत आहेत. या प्रणालीपासून वायव्य उत्तर प्रदेशातील चक्राकार वार्‍यापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा आहे. महाराष्ट्राचा मध्य भागात पूर्व-पश्‍चिम वार्‍यांचे जोडक्षेत्र सक्रिय आहे. महाराष्ट्र ते केरळ किनार्‍याला लागून हवेचा दक्षिणोत्तर कमी दाबाचा पट्टा कायम आहे. मुंबईसह कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भात मध्यम पाऊस असतांना, हवामान विभागाने बुधवारपर्यंत कोकण, मध्य महाराष्ट्रात, विदर्भात तुरळक ठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज वर्तवला. दक्षिण महाराष्ट्र ते केरळ किनारपट्टीवर कमी दाबाचे क्षेत्र तयार झाल्याने कोकण आणि मध्य महाराष्ट्रात 30 जून ते 3 जुलै या चार दिवसांत मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. तसंच विदर्भातही मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला. 1 जुलै रोजी रायगड, रत्नागिरी, पुणे तर 1 जुलैला सिंधुदुर्ग आणि 2 जुलैला पुण्यातील घाट परिसरात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली. त्यामुळे या ठिकाणी ऑरेंज अलर्टची घोषणा हवामान विभागाने केली. तर 1 ते 3 जुलै दरम्यान बहुतांश जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी मेघगर्जना गर्जना विजांचा कडकडाट आणि ताशी 30 ते 40 किलोमीटर प्रतितास वेगाने सोसाट्याच्या वार्‍यासह पाऊस पडणार असून या जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी करण्यात आला. सोमवारपासून 3 जुलै दरम्यान पालघर ठाणे, सिंधुदुर्ग तर 1 ते 3 जुलै दरम्यान सातारासह नाशिक जिल्ह्यात घाट परिसरात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडणार असून या जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी करण्यात आला. मुंबई आणि पुणे शहरात सोमवारी आकाश सामान्यत: ढगाळ असणार असून हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पाऊस होण्याची शक्यता वर्तविण्यात आली. 1 जुलैनंतर आकाश सामान्यत: ढगाळ राहण्याची शक्यता असून हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसासह संततधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.

कोकणात पावसाचा ऑरेंज अलर्ट – कोकणात पावासाचा ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. यामध्ये रायगड आणि रत्नागिरी या दोन जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. तर पश्‍चिम महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्याला पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. त्या पार्श्‍वभूमीवर नागरिकांनी योग्य ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. मुंबईसह पालघर आणि ठाण्यात देखील जोरदार पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तसेच सातारा आणि सिंधुदुर्ग या दोन जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. त्याचबरोबर आज संपूर्ण विदर्भात पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे.

COMMENTS