नवी दिल्ली/प्रतिनिधी : न्यूझीलंडचे माजी अष्टपैलू खेळाडू ग्रँट ब्रॅडमन यांची पाकिस्तान पुरुष क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक म्हणून नियुक्ती करण्या
नवी दिल्ली/प्रतिनिधी : न्यूझीलंडचे माजी अष्टपैलू खेळाडू ग्रँट ब्रॅडमन यांची पाकिस्तान पुरुष क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. प्रशिक्षणाचा कार्यकाळ 2 वर्षांचा असेल. या आधी ग्रँट पाकिस्तान क्रिकेट संघाचे सल्लागार म्हणून काम करत होते. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने शनिवारी ग्रँट ब्रॅडमन यांची मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्ती जाहीर केली. न्यूझीलंडविरुद्ध नुकत्याच पार पडलेल्या वनडे मालिकेत ग्रँट पाकिस्तान संघाचे प्रभारी होते. या मालिकेत बाबर आझमच्या संघाने न्यूझीलंडविरुद्ध 4-1 असा विजय मिळवला. न्यूझीलंडचा माजी खेळाडू 56 वर्षीय असून, ग्रँट किवी संघाकडून अष्टपैलू खेळाडू म्हणून खेळत असे. ब्रॅडबर्नने 7 कसोटी आणि 11 एकदिवसीय सामन्यांमध्ये न्यूझीलंडचे प्रतिनिधित्व केले आहे. जवळपास 11 वर्षे ग्रँट न्यूझीलंडकडून खेळले आहेत. यानंतर ग्रँटने कोचिंगमध्ये येण्याचा विचार केला. त्यांनी 2018 ते 2020 या वर्षात पाकिस्तान संघाचे क्षेत्ररक्षण प्रशिक्षकपद सांभाळले. यानंतर ग्रँटने पाकिस्तानसाठी राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये काम केले.
पीसीबीचे अध्यक्ष नजम सेठी यांनी एका निवेदनात म्हटले की, ब्रॅडबर्नचा अनुभव लक्षात घेऊन त्याला पाकिस्तान क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक बनवण्यात येत आहे. पीसीबी प्रमुखांच्या म्हणण्यानुसार, एनसीएमध्ये आमच्या पुरुष संघासोबत काम केल्यामुळे ग्रँटला आमची खेळाची रीत चांगल्या प्रकारे समजते. पाकिस्तान संघाला पुढे नेण्यासाठी ग्रँट आदर्श उमेदवार आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने अलीकडेच माजी मुख्य प्रशिक्षक मिकी आर्थर यांना संघ संचालक म्हणून नियुक्त केले. दरम्यान, अफगाणिस्तानविरुद्धच्या तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेव्यतिरिक्त 50 षटकांच्या आशिया चषकासाठी पाकिस्तान संघाचे संचालक म्हणून आर्थरची नियुक्ती करण्यात आली आहे. याआधी बराच काळ आर्थर पाकिस्तानचे मुख्य प्रशिक्षक होते. आर्थरने पाकिस्तान क्रिकेट संघाला ऑनलाइन कोचिंगही दिले आहे. याशिवाय दक्षिण आफ्रिकेचा माजी क्रिकेटर अँड्र्यू पुटिक पुढील 2 वर्षांसाठी पाकिस्तान क्रिकेट संघाचा फलंदाजी प्रशिक्षक असणार आहे.
COMMENTS