नव्या वर्षाचे स्वागत सगळीकडेच धुमधडाक्यात साजरे करण्यात येत आहे. गत वर्षाला निरोप आणि नव्या वर्षाचे स्वागत करतांना सगळीकडे धूम सुरु असतांना, दुस

नव्या वर्षाचे स्वागत सगळीकडेच धुमधडाक्यात साजरे करण्यात येत आहे. गत वर्षाला निरोप आणि नव्या वर्षाचे स्वागत करतांना सगळीकडे धूम सुरु असतांना, दुसरीकडे कोरोनाचे सावट वाढतांना दिसून येत आहे. एकंदरित 2020 आणि 2021 च्या कोरोनाच्या संघर्षमय काळानंतर 2022 वर्ष जेमतेम विचार करता, आनंदी राहिले. अर्थव्यवस्थेची भर-भराट, रोजगारांची मुबलकता नव्या संधी या 2022 ने अनेकांना दिल्या. त्याचबरोबर रशिया-युक्रेन युद्धाच्या झळा देखील अनेकांनी अनुभवल्या.
मात्र आज नव्या वर्षाचे स्वागत करतांना, बाजारपेठांमध्ये गर्दी होताना नववर्षानिमित्त आयोजित केलेल्या विविध उपक्रमांचे नियोजनही पहावयास मिळत होते. युवक-युवतींनी तर वर्षाला निरोप देताना ईडा-पिडा टळो आणि खुशालीचा संदेश घेऊन नवर्ष येवो, अशी मनोकामना केल्याचे पहावयास मिळत होते. तरूणाईच्या उत्साहावर हलक्या पध्दतीने फुंकर मारत त्यांना पाठबळ देण्याची गरज आहे. तशा प्रकारचे पाठबळ समाज तसेच सरकारकडून व्हावे, अशी अपेक्षा आहे. रातोरात श्रीमंत होण्यापेक्षा नियमित रोजीरोटी मिळविणार्यांकडे सरकारने लक्ष देणे गरजेचे असल्याचे मत तरूणाई व्यक्त करत आहे. आरोग्य, शिक्षण यासारख्या घटकांकडे सरकारने आपला प्राधान्यक्रम दिला पाहिजे तरच उद्याची पिढी नव्या जोमाने तयार होईल. अन्यथा कोणीतरी करेल की, अशी अपेक्षा करून बसल्यास समाजातील समतोल बिघडण्याची शक्यता आहे. त्यामुळे अन्न, वस्त्र व निवारा ह्या गरजा आता पुर्ण करण्याची गरज तर आहेच मात्र, त्याच्या पुढे जावून समाजाच्या जडण घडणीत समाजातील असंख्य घटनांना उर्जितावस्था देण्याची गरज आहे. त्यामध्ये शिक्षण, चांगले रस्ते, काळानुरुप बदल झालेली सरकारी यंत्रणा तसेच विद्यापीठांचा अभ्यासक्रम यांचा समावेश होेतो. सर्व गोष्टी सरकारने कराव्यात असा अट्टाहास कोणत्याही व्यक्तीने करू नये. कारण एवढा विचार करण्यासाठी सरकारच्या धोरणामध्ये उच्च शिक्षित लोक तसेच निश्कलंक लोक कार्यरत नाहीत. आजच्या सामाजिक गरजांना पुरेल इतक्या पायाभुत सुविधा उपलब्ध करून देण्याचा सरकार प्रयत्न करत आहे. गेल्या वर्षभरात लॉकडाऊनच्या अडचणीतून मुक्ती मिळाली. मात्र, निर्णय क्षमतेच्या लोकांच्या चूकीच्या नियोजनामुळे प्रकल्पांचे स्थालांतरणासह युवकांवर बेरोजगारीची कुर्हाड कोसळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. यामध्ये नव्या कंपन्या येण्यापेक्षा पुणे येथील हिंजवडीच्या आयटी पार्कमधील काही कंपन्यांनी प्रशासनाकडून सार्वजनिक वाहतूकीचे नियमन व्यवस्थित होत नसल्याने आपला कारभार इतरत्र स्थालांतरीत करण्याचे नियोजन केले असल्याचा गौप्यस्फोट विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी हिवाळी अधिवेशनात केला. त्यामुळे सत्ताधारी लोकप्रतिनिधींसह पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. गेले कित्त्येकदा विद्यमान विरोधी पक्ष नेते अजित पवार हेच पुण्याचे पालकमंत्री होते. त्यामुळे अजित पवार यांचे पुण्यातील आयटी पार्कचे स्थालांतरण होण्याच्या घटनांकडे बारकाईने लक्ष असल्याचे दिसून येत आहे. या स्थालांतरणामुळे पुणे परिसरात स्थायिक झालेल्या अभियंत्यांना नव्याने नोकरीच्या शोधात फिरावे लागणार आहे. आयटी पार्क पुणे येथे झाल्यापासून पुणे जिल्ह्याचा कायापालट झाला असल्याचे आपणास पहावयास मिळत आहे. हेच आयटी पार्कमधील महत्वाच्या कंपन्या जर गुजरात सारख्या राज्यात स्थालांतरीत झाल्या तर काय होईल? याची कल्पना करणे धोक्याचे आहे. पुणे विद्यापीठाच्या माध्यमातून सुुरु झालेल्या विविध नामांकित अभ्यासक्रमाच्या दर्जात सुधारणा होण्याची गरज निर्माण झाली आहे. देशभरातील विद्यापीठांच्या गुणवत्ता यादीमध्ये पुणे विद्यापीठाचा दबदबा कमी होत चालला असल्याचे दिसून येत आहे. त्याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवर होवू लागला आहे. भविष्यात हे असेच होत राहिले तर शिक्षणाचे माहेर अशी ओळख पुसली जाण्याची दाट शक्यता आहे. या निमित्त देशासह राज्याच्या जडणघडणीच्या कामात हातभार लावणार्यांमध्ये अचुकतेची जाण असणे गरजेचे आहे. अगामी वर्षात तरी याकडे सरकारने लक्ष केंद्रित करण्याची अपेक्षा आजच्या तरूणाईने व्यक्त केली आहे.
COMMENTS