Homeताज्या बातम्यादेश

चांद्रयान प्रक्षेपणाचा युट्यूबवर नवा विक्रम

नवी दिल्ली ः भारताच्या चंद्रयान-3 ने बुधवारी चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यशस्वी लँडींग करीत नवा इतिहास रचला असतांनाच, इस्रोच्या लाईव्ह स्ट्रीमिंग

शामगाव येथे पिण्याच्या पाण्याचे एटीएम
राज्यात 108 रुग्णवाहिकांची संख्या दुपटीने वाढणार
तब्बल 30 हजार सिम कार्डस केले बंद

नवी दिल्ली ः भारताच्या चंद्रयान-3 ने बुधवारी चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यशस्वी लँडींग करीत नवा इतिहास रचला असतांनाच, इस्रोच्या लाईव्ह स्ट्रीमिंग लिंकने देखील युट्यूबवर नवा इतिहास रचला आहे. जगाच्या कानाकोपर्‍यातून जेथे कुठे भारतीय राहातात तेथून त्यांनी हा सोहळा याचि देही याचि डोळा अनुभवला असल्याने इस्रोचे चंद्रयान-3 लँडींग लाईव्ह स्ट्रीमिंग 8.06 दशलक्ष (80 लाख) लोकांनी पाहिल्याने युट्यूबच्या इतिहासातील सर्व रेकॉर्ड मोडीत काढले आहेत. आतापर्यंत युट्यूबवर ब्राझील विरुध्दचा दक्षिण कोरीयाची फुटबॉल मॅचचे लाईव्ह स्ट्रीमिंग सर्वाधिक 6.15 दशलक्ष लोकांनी एकाच वेळी जगभरात पाहीले गेली होती.

COMMENTS