Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

नवीन शिक्षण धोरण, ज्ञाननिर्मितीस पूरक

निलंगा प्रतिनिधी - देशाच्या सर्वांगीण विकासात शिक्षणाचे योगदान महत्त्वाचे असून नवीन शिक्षण धोरण संशोधन व ज्ञाननिर्मितीला पूरक असल्याचे प्रतिपादन

शिक्षण सहसंचालकासह तिघे ‘लाचलुचपत’ च्या जाळ्यात
राज्यात ३.१४ लाख कोटीची विक्रमी परकीय गुंतवणूक -उपमुख्यमंत्री फडणवीस
सर्वसामान्यांना मोठा दिलासा, खाद्य तेलाच्या किमतीत घट

निलंगा प्रतिनिधी – देशाच्या सर्वांगीण विकासात शिक्षणाचे योगदान महत्त्वाचे असून नवीन शिक्षण धोरण संशोधन व ज्ञाननिर्मितीला पूरक असल्याचे प्रतिपादन डॉ.अजित मुळजकर यांनी केले. निलंगा तालुक्यातील औराद शहाजणी येथील मास्टर दीनानाथ मंगेशकर महाविद्यालयात राष्ट्रीय शैक्षणिक धोरण सप्ताहानिमित्त अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाच्या वतीने आयोजित ‘राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 : अंमलबजावणी, संधी व आव्हाने’ या विषयावरील व्याख्यानात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी प्रभारी प्राचार्य डॉ.प्रदीप पाटील हे उपस्थित होते.
पुढे बोलताना डॉ.मुळजकर म्हणाले की, उच्च शिक्षणातील विद्यार्थ्यांचा प्रवेश वाढविणे, संशोधन व नाविन्यपूर्ण उपक्रमास चालना देणे, बहविद्याशाखीय शिक्षणाची संधी व सोय, व्यावसायिक व कौशल्याधारित शिक्षणावर भर, स्वयम व एन.पी.टी.एल. पोर्टल इत्यादीबाबत सप्रमाण मार्गदर्शन केले. केंब्रिज, हार्वर्ड, ऑक्सफर्ड विद्यापीठातून संशोधन लेख व संदर्भग्रंथ प्रकाशित होतात. तशाच पद्धतीने भारतीय विद्यापीठातूनही संशोधन व लेखन होण्यासाठी नवीन शिक्षण धोरण पूरक असल्याचे ते म्हणाले. नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणातून स्वायत्त महाविद्यालये व रोजगार निर्मिती अधिक प्रमाणात होणार असल्याचेही त्यांनी याप्रसंगी सांगितले. अध्यक्षीय समारोप प्रभारी प्राचार्य डॉ.प्रदीप पाटील यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन व प्रास्ताविक डॉ.विजयकुमार पवार यांनी केले. तर आभार डॉ.सचिन हंचाटे यांनी मानले.

COMMENTS