आपण कितीही आरोग्याची काळजी घेतली तरी देखील किरकोळ आजार जसे सर्दी, खोकला, पोटात दुखणे यासारखे आजार सर्वानाच होत असतात. काही लोक डॉक्टरकडे जाऊन रित
आपण कितीही आरोग्याची काळजी घेतली तरी देखील किरकोळ आजार जसे सर्दी, खोकला, पोटात दुखणे यासारखे आजार सर्वानाच होत असतात. काही लोक डॉक्टरकडे जाऊन रितसर उपचार घेतात. तर काही लोक याकडे दुर्लक्ष करतात आणि घरगुती औषध घेतात. पण कधीकधी किरकोळ आजारांकडे दुर्लक्ष करणं हे धोक्याचं ठरु शकतं. असंच एका महिलासोबत घडलं. या महिलेच्या अनेक वर्षांपासून पोटात दुखत होतं, पण या महिलेनं त्याकडे फारसं लक्ष दिसं नाही. पण अखेर तिला यामागचं सत्य कळालं तेव्हा ती हादरली.या महिलेचं गेल्या 11 वर्षांपासून पोटात दुखत होतं. तिने सामान्य समजून ते टाळले. वेदना वाढल्या की अखेर यामुळे तिची परिस्थीती खालावली ज्यामुळे तिला रुग्णालयात दाखल करावे लागले. चाचणीसाठी डॉक्टरांनी महिलेचा एमआरआय केला. त्याचा रिपोर्ट जेव्हा समोर आला, तेव्हा मात्र डॉक्टर देखील आश्चर्यचकित झाले. खरंतर या तरुणीच्या पोटात सुई आणि धागा अडकला होता. कोलंबियातील एका गावातील एका 39 वर्षीय महिलेसोबत घडलेला हा धक्कादायक प्रकार आहे. ज्यामुळे ती मागील ११ वर्शापासून असह्य वेदना सहन करत होती. डॉक्टरांना दाखवल्यानंतरच तिच्यासमोर खरं सत्य आलं. एका वृत्तानुसार, कोलंबियाच्या मारिया एडेरलिंडा फोरोने 2012 मध्ये तिच्या चौथ्या मुलाला जन्म दिल्यानंतर तिच्या फॅलोपियन ट्यूबचे ऑपरेशन केले होते. अहवालात असा दावा करण्यात आला आहे की शस्त्रक्रिया करताना डॉक्टरांनी काही शस्त्रक्रिया साहित्य पोटात सोडले होते. कोलंबियन वीकली मॅगझिनला दिलेल्या मुलाखतीत फोरोने सांगितले की, यापूर्वी ती या वेदनांना सामान्य मानत होती. ऑपरेशननंतर असा त्रास होतो असं तिला वाटलं होतं. पण वेदना वाढल्यानंतर मात्र हे भलतच प्रकरण उघड झालं.
COMMENTS