Homeताज्या बातम्यादेश

आव्हानांवर सामूहिकपणे मात करण्याची गरज ः पंतप्रधान मोदी

नवी दिल्ली : भारताकडे या वर्षी जी-20 समूहाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी असल्यामुळे जी-7 शिखर परिषदेतील माझी उपस्थिती अधिक अर्थपूर्ण ठरणार आहे. जगासम

पंतप्रधान मोदी आज कारगिलला भेट देणार
जम्मू-काश्मीरला राज्याचा दर्जा देऊ ः पंतप्रधान मोदी
कट्टर भ्रष्टाचारी बंगळुरुमध्ये एकत्र

नवी दिल्ली : भारताकडे या वर्षी जी-20 समूहाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी असल्यामुळे जी-7 शिखर परिषदेतील माझी उपस्थिती अधिक अर्थपूर्ण ठरणार आहे. जगासमोर सध्या उभी असलेली आव्हाने आणि त्यांच्यावर सामूहिकपणे मात करण्याची गरज यासंदर्भात जी-7 सदस्य राष्ट्रे, तसेच इतर निमंत्रित भागीदार यांच्यासोबत विचारांची देवाणघेवाण करण्यास मी उत्सुक असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. जपान, पापुआ न्यू गिनी आणि ऑस्ट्रेलिया या देशांच्या दौर्‍यावर निघण्यापूर्वी त्यांनी निवेदन जारी केले.
जपानचे पंतप्रधान ़फुमिओ किशिदा यांच्या आमंत्रणावरुन मी जपानच्या अध्यक्षतेखाली होत असलेल्या जी-7 शिखर परिषदेला उपस्थित राहण्यासाठी जपानमधील हिरोशिमा येथे जाण्यासाठी निघणार आहे. भारत-जपान शिखर परिषेदच्या निमित्ताने पंतप्रधान नुकतेच भारत भेटीसाठी येऊन गेले, तेव्हा झालेल्या भेटीनंतर लगेचच पुन्हा त्यांची भेट घेणे अत्यंत आनंददायी आहे. आहे. हिरोशिमा जी-7 शिखर परिषदेला उपस्थित राहण्यासाठी आलेल्या काही नेत्यांशी मी द्विपक्षीय बैठका देखील घेणार आहे.

COMMENTS