साहित्यिक चळवळ विद्यार्थ्यांमध्ये रुजवण्याची गरज – अभय आव्हाड

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

साहित्यिक चळवळ विद्यार्थ्यांमध्ये रुजवण्याची गरज – अभय आव्हाड

पाथर्डी /प्रतिनिधी : शब्दगंध साहित्यिक परिषद महाराष्ट्र राज्य च्या पाथर्डी तालुकाध्यक्षपदी प्रा. डॉ. अनिल पानखडे यांची निवड झाल्याबद्दल पार्थ विद्या

पत्रकार बाळ बोठेला हायकोर्टाचा दणका ; जामीन अर्ज फेटाळला | DAINIK LOKMNTHAN
विकास कामांमध्ये महिला अव्वलस्थानी- डॉ. प्रतिभाताई पाचपुते
भंडारदरा परिसरात स्वातंत्र्यदिनानिमित्त एकेरी वाहतूक

पाथर्डी /प्रतिनिधी : शब्दगंध साहित्यिक परिषद महाराष्ट्र राज्य च्या पाथर्डी तालुकाध्यक्षपदी प्रा. डॉ. अनिल पानखडे यांची निवड झाल्याबद्दल पार्थ विद्या प्रसारक मंडळ व बाबुजी आव्हाड महाविद्यालयाच्या वतीने संस्थेचे अध्यक्ष अभय आव्हाड यांच्या हस्ते नुकताच सत्कार करण्यात आला.

याप्रसंगी बोलताना आव्हाड म्हणाले की, साहित्य  विद्यार्थ्यांमध्ये रुजण्याची आज आवश्यकता आहे. विद्यार्थी हा वाचनापासून भरकटत चालला आहे. करोना महामारीच्या काळात विद्यार्थी हा अस्थिर झाल्यामुळे त्याला पुन्हा वाचनाची गोडी निर्माण करायची असेल तर वाचन आणि लिखाण त्याचबरोबर साहित्य या सर्वच गोष्टी त्याच्यासाठी आवश्यक आहेत.वाचन चळवळ वृद्धिंगत होण्यासाठी साहित्याची गरज आहे.त्यामुळे विद्यार्थ्यांना त्याची अधिक गोडी निर्माण व्हावी यासाठी शब्दगंध परिषदेने वेगवेगळे कार्यक्रम घेऊन विद्यार्थ्यांना संधी उपलब्ध करून द्यावी असे मत यावेळी त्यांनी व्यक्त केले. प्रा.डॉ.अनिल पानखडे म्हणाले की,ग्रामीण भागातील अनेक विद्यार्थी हे लिहीत असून त्यांच्या लिखाणाला चालना मिळावी त्यांचे साहित्य प्रकाशित व्हावे त्यासाठी विविध कार्यक्रम राबवून विद्यार्थ्यांना साहित्याची गोडी निर्माण करण्यासाठी लवकरच शब्दगंध साहित्यिक परिषद,पाथर्डी शाखेच्या वतीने तालुक्यातील विद्यार्थ्यांसाठी कवी संमेलनाचे आयोजन करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष अभय आव्हाड,महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.जी.पी.ढाकणे, इतिहास विभाग प्रमुख प्रा.डॉ.अशोक कानडे, महाविद्यालयाचे अधीक्षक शशिकांत काळोखे व संजय बडे आदी मान्यवर उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य डॉ. जी. पी. ढाकणे यांनी केले. सूत्रसंचालन शशिकांत काळोखे  यांनी केले तर आभार डॉ.अशोक कानडे यांनी मानले.

COMMENTS