Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

जिल्ह्याच्या विकासाला गती देण्याची गरज- संदीप शेळके 

पिंपळगाव राजात क्रांतिदिनानिमित्त रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

खामगाव : जिल्ह्याचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी विकासाला गती देण्याची गरज आहे. ही ध्येयपूर्ती करण्यासाठी वन बुलढाणा मिशनच्या माध्यमातून लोकचळवळ

अहमदनगरमध्ये नगरसेवकावर दिवसाढवळ्या गोळीबाराचा प्रयत्न
कर्जतमध्ये महसूल कर्मचाऱ्यांचे बेमुदत काम बंद आंदोलन
पालिका निवडणुकीत राष्ट्रवादी बलाढ्य तर विकास आघाडीसमोर ऐक्याचे आव्हान

खामगाव : जिल्ह्याचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी विकासाला गती देण्याची गरज आहे. ही ध्येयपूर्ती करण्यासाठी वन बुलढाणा मिशनच्या माध्यमातून लोकचळवळ सुरु केली आहे. युवकांनी यामध्ये मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन राजर्षी शाहू परिवाराचे अध्यक्ष संदीपदादा शेळके यांनी केले. तालुक्यातील पिंपळगाव राजा येथील स्व. हसनराव देशमुख सभागृहात क्रांतिदिनानिमित्त ९ ऑगस्ट रोजी आयोजित रक्तदान शिबिर, युवक मेळावा आणि महिला बचतगटांना कर्जवाटप कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी सरपंच शेख शाकिर शेख चांद, सुनील राजपूत, अल्पसंख्याक मुस्लिम न्याय हक्क समितीचे जिल्हाध्यक्ष जुलरूर शेख शेख चांद, विठ्ठल देशमुख, नारायण गावंडे, आवेद खान, वसंत तेलंग, प्रा. निसार अख्तर, डॉ. आर. के. राजपूत, अमोल राजपूत, चरण राजपूत, कोमल राजपूत, विशाल राजपूत यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. 

प्रारंभी महामानवांच्या प्रतिमेचे मान्यवरांच्या हस्ते पूजन करण्यात आले. रक्तदान शिबिरात ३० जणांनी रक्तदान करुन उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. महिला बचतगटांच्या ३० महिलांना १२ लाख रुपयांचे अर्थसहाय्य करण्यात आले. संदीपदादा शेळके यांच्या हस्ते महिलांना धनादेश वितरण करण्यात आले. संचलन पृथ्वीराज राजपूत यांनी तर आभार सुनील राजपूत यांनी मानले

COMMENTS