अंबाजोगाई प्रतिनिधी - दिवसेंदिवस कॅन्सर च्या रुग्णांचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे नियमित आरोग्य तपासणी करणे काळाची गरज असल्याचे मत आमदार नमिता मुं
अंबाजोगाई प्रतिनिधी – दिवसेंदिवस कॅन्सर च्या रुग्णांचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे नियमित आरोग्य तपासणी करणे काळाची गरज असल्याचे मत आमदार नमिता मुंदडा यांनी व्यक्त केले. परशुराम जन्मोत्सव निमित्त पेशवा प्रतिष्ठान , अस्तित्व महिला संघटन , इंडियन मेडिकल असोसिएशन, तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय यांच्या वतीने कर्करोग जनजागरण रॅली चे आयोजन शुक्रवारी करण्यात आले होते. या रॅलीचा उद्घाटन प्रसंगी आ नमिता मुंदडा बोलत होत्या. यावेळी व्यासपीठावर डॉ नवनाथ घुगे, डॉ अरुणा केंद्रे, डॉ अर्चना थोरात ,सौ स्वरुपा कुलकर्णी , सौ कल्याणी कुलकर्णी यांची उपस्थिती होती. यावेळी डॉ अर्चना थोरात यांनी मार्गदर्शन करताना स्तनांच्या कॅन्सरनंतर सर्व्हिकल कॅन्सर, पोटाचा कॅन्सर, कोलोन आणि रेक्टम आणि लिप अँड कॅव्हिटी कॅन्सरची प्रकरणं सर्वांत जास्त समोर येत आहेत.ङ्ग गावं आणि शहरांमध्ये तुलना केली तर गावांमध्ये सर्व्हिकल आणि शहरांमध्ये स्तनाच्या कॅन्सरची प्रकरणं जास्त आढळतात. पण संपूर्ण भारतातच महिलांमध्ये स्तनांचा कॅन्सर सगळ्यांत जास्त आढळतो. उशीरा लग्न होणं, उशीरा होणारी गर्भधारणा, स्तनपान कमी करणं, वाढता तणाव, जीवनशैली आणि स्थूलपणा ही यामागची कारणं आहेत असे सांगितले. डॉ घुगे यांनी युवकांनी व्यसनापासून दूर राहण्याचे आवाहन केले. डॉ अरुणा केंद्रे म्हणाल्या की, कॅन्सर हा कोणालाही होवू शकतो, परंतु काही गोष्टींची काळजी घेतली तर नक्कीच आपल्याला कॅन्सर पासून दूर राहता येईल. त्यामुळे अश्या जनजागरण रॅलीचे आयोजन करणे महत्त्वाचे आहे. कार्यक्रमाच्या प्रास्ताविक स्वरुपा कुलकर्णी यांनी केले. सूत्र संचालन निशिगंघा मॅडम यांनी केले तर आभार प्रदर्शन डॉ संकेत तोरंबेकर यांनी केले. रॅली यशस्वी करण्यासाठी पेशवा प्रतिष्ठान चे राहुल कुलकर्णी , शिरीष हिरळकर, विशाल जहागीरदार,अक्षय पिंगळे, डॉ संकेत तोरंबेकर, विवेक बाभुळगावकर , गोविंद जोशी ,विनय चौसाळकर, गौरव कुलकर्णी , केदार दामोशन, पार्थ कुलकर्णी ,ड वैजनाथ वांजरखेडे ,वामन खोत डॉ प्रवीण जोशी यांनी पुढाकार घेतला. या रॅलीला शहरातील नामवंत डॉक्टर्स, आशा कार्यकर्ती , अस्तित्व महिला संघटनेच्या पदाधिकारी , पेशवा प्रतिष्ठान चे सदस्य तसेच नागरिकांनी सहभाग नोंदविला.
COMMENTS