Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

राष्ट्रवादीच्या नव्या चिन्हाचे शरद पवार यांच्या हस्ते अनावरण

रायगड प्रतिनिधी - राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाला निवडणूक आयोगाने तुतारी वाजवणारा माणूस असं निवडणूक चिन्ह दिलं आहे. हे ऐतिहासिक चिन्ह

..तर, महाराष्ट्र पेटून उठेल – शरद पवार
कोणताच धर्म चुकीच्या प्रवृत्तीचे समर्थन करत नाही
आमचे लक्ष उद्याची विधानसभा निवडणुकीवरच

रायगड प्रतिनिधी – राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाला निवडणूक आयोगाने तुतारी वाजवणारा माणूस असं निवडणूक चिन्ह दिलं आहे. हे ऐतिहासिक चिन्हाचं अनावरण शरद पवार गटाने किल्ले रायगडावर जाऊन केलं. किल्ले रायगडावर आज भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात शरद पवारांच्या हस्ते या चिन्हाचे अनावरण करण्यात आले. तुतारी हे चिन्ह सर्वांसाठी प्रेरणादायी ठरेल, असा विश्वास शरद पवारांनी यावेळी व्यक्त केला.

शरद पवारांच्या हस्ते चिन्हाचे अनावरण झाल्यानंतर शरद पवारांनी उपस्थित जनतेशी संवाद साधला. “सध्याचा संघर्ष हा वैचारिक आहे. या देशात अनेक राजे झाले, संस्थानिक झाले परंतु रयतेचा राजा एकच झाला. सध्या राज्यात अडचणी वाढतील अशी स्थिती आहे. शिवछत्रपतींचे राज्य सामान्यांची सेवा करणारे राज्य होते. आज महाराष्ट्राची स्थिती बदलायची असेल तर पुन्हा एकदा याठिकाणी जनतेचे राज्य येईल यासाठी प्रयत्न करावे लागतील. निवडणूक आयोगाने रणशिंग फुकायला तुतारी दिली आहे. संघर्षातून प्रेरणा देणारी ही तुतारी आहे. तुमच्या संघर्षातून, त्यागातून यश मिळणार याची खात्री आहे. या ऐतिसाहिक भूमीत आपण आलोय. याठिाकणाहून प्रेरणा घेऊन जनतेची सेवा करुया.

COMMENTS