सोलापूर प्रतिनिधी - राज्यात सत्तांतर झाल्यानंतर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. राष्ट्रवादी काँगे्रसमधील 12 आमदार लवकरच बाहेर पडणार असल्याचे व
सोलापूर प्रतिनिधी – राज्यात सत्तांतर झाल्यानंतर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. राष्ट्रवादी काँगे्रसमधील 12 आमदार लवकरच बाहेर पडणार असल्याचे विधान शिंदे गटाचे आमदार शहाजीबापू पाटील यांनी केल्यामुळे खळबळ उडाली आहे. सोलापूरात बोलतांना पाटील म्हणाले की, शिंदे फडणवीस सरकारच्या विरोधात यासाठी बोलले जाते, कारण राष्ट्रवादीतील 12 नेते फुटलेले आहेत. पण ज्याचा त्याचा मुहूर्त ठरायचा आहे. सोलापूर जिल्ह्यातील मोठ्यातील मोठ्या नेत्याचा राष्ट्रवादीला दणका बसणार आहे. सोलापुरातील हा नेता फुटणार आहे. जरा थांबा. ठरवून सगळे शिजवून झालेले आहे. फक्त झाकण उघडायचे आणि वाढायचे आहे, असा दावा शहाजी बापू पाटील यांनी केला आहे.
शहाजी पाटील म्हणाले की, सरकार पाडण्याची भाकीते अनेकदा केली आहेत. 95 साली मी काँग्रेसचा आमदार होतो. त्यावेळी 5 वर्ष शरद पवार आम्हाला सांगायचे पुढच्या महिन्यात सरकार पडणार आहे. परंतु मनोहर जोशी, नारायण राणेंचे सरकार काही पडले नाही. आम्हाला निवडणुकीला सामोरं जावं लागेल. आताही सरकार पडणार असे विधान करून यांच्या पक्षातील नेते भाजपा-बाळासाहेबांची शिवसेना यात येणार आहेत त्यांना अडवण्यासाठी भीती निर्माण करत आहे असं त्यांनी सांगितले. त्याचसोबत 15 वर्षाला आषाढीला कुणीही येण्याची गरज नाही. शिंदे-फडणवीस आषाढी, कार्तिकीची पूजा करतील. सुषमा अंधारे यांनी विधाने मतभेद करणारी आहेत. त्यांच्यावर फारसं बोलण्यासारखं नाही. उद्धव ठाकरेंना अडीच वर्ष मुख्यमंत्री राहून काम करता आले नाही. त्यामुळे आमदारांमध्ये असंतोष पसरला. प्रत्येक आमदार, नेता स्वत:चं अस्तित्व टिकवण्याचा प्रयत्न करतो. अजित पवार हे मोठे राजकारणी, 95 साली कुठे गेले होते. त्यावेळी सरकार पडले नाही. शिवसेना-भाजपा मिळून 100 जागा नव्हत्या. आता 170 जागा आहेत. त्या पाडायला निघाल्यात. त्यांच्या विधानाकडे लक्ष देण्याची गरज नाही असं शहाजीबापू पाटील यांनी म्हटलं.
राष्ट्रवादी काँग्रेसने फेटाळला दावा – आमच्या पक्षाबद्दल काही अफवा पसरवल्या जात असून, हा त्यातलाच प्रकार आहे. आमचे सर्व आमदार एकत्र आहोत. घट्ट आहोत आणि एकजीवाने काम करतोय असे सांगत राष्ट्रवादी नेते राजेश टोपे यांनी शहाजीबापू पाटलांचा दावा फेटाळून लावला आहे.
COMMENTS