मुंबई/प्रतिनिधी ः राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. अनंत करमुसे मारहाण प्रकरणाची चौकशी पुढे सुरू ठेवा, असे
मुंबई/प्रतिनिधी ः राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. अनंत करमुसे मारहाण प्रकरणाची चौकशी पुढे सुरू ठेवा, असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत, अशी माहिती करमुसे यांनी शुक्रवारी प्रसार माध्यमांशी बोलताना दिली. करमुसे मारहाण प्रकरणी तीन महिन्यांत तपास अहवाल द्यावा, अशा सूचनाही न्यायालयाने दिल्या आहेत.
महाविकास आघाडी सरकारच्या काळात हा तपास बंद करण्यात आला होता. अनंत करमुसे यांनी 5 एप्रिल 2020 रोजी जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात सोशल मीडियावर आक्षेपार्ह विधान केले, असा आरोप करत आव्हाड यांच्या समर्थकांनी करमुसे यांना मारहाण केली होती. करमुसे हे घोडबंदच्या कावेसरमध्ये राहतात. येथून करमुसे यांना आव्हाड यांच्या निवासस्थानी नेण्यात आले. तिथे ही मारहाण झाली. या प्रकरणी 14 ऑक्टोबर 2021 रोजी आव्हाड यांना ठाणे पोलिसांनी बेड्या ठोकल्या. त्यानंतर त्यांची जामीनावर सुटका झाली. या प्रकरणात करमुसे यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. करमुसे मारहाण प्रकरणाचा तपास महाविकास आघाडी सरकारच्या काळात बंद करण्यात आला होता. आता तो तपास पुढे सुरू ठेवा, असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत , अशी माहिती स्वतः अनंत करमुसे यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे. करमुसे म्हणाले की, महाविकास आघाडी सरकारच्या काळात ही चौकशी बंद झाली. मात्र, ती आता सुरू झाली आहे. केंद्रीय यंत्रणा असो की, महाराष्ट्र पोलिस कोणीही चौकशी करावी. आव्हाडांची चौकशी होणार याचा मला आनंद आहे.
COMMENTS