पुणे : पुण्यातून बेपत्ता झाल्यानंतर माओवादी चळवळीत ओढला गेलेला तरुण संतोष वसंत शेलार उर्फ पेंटर हा पुणे पोलिसांना शरण आला असून तो आत्मसमर्पण करणा
पुणे : पुण्यातून बेपत्ता झाल्यानंतर माओवादी चळवळीत ओढला गेलेला तरुण संतोष वसंत शेलार उर्फ पेंटर हा पुणे पोलिसांना शरण आला असून तो आत्मसमर्पण करणार आहे. शेलार हा गेल्या काही दिवसांपासून आजारी असून तो पुण्यात आला होता. शेलारला माओवाद्यांमध्ये शेलार पेंटर या नावाने ओळखले जाते. तो नक्षली कमांडर देखील झाला होता. शेलार (वय 33) हा मूळचा भवानी पेठेतील कासेवाडी येथील रहिवासी आहे. तो 2010 पासून बेपत्ता होता. त्याच्या कुटुंबीयांनी तो हरवला असल्याची तक्रार खडक पोलिस ठाण्यात दिली होती.
सध्या त्याला ससुनमध्ये भरती करण्यात आले असून त्याच्यावर महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथक निगरानी ठेवून आहे. संतोष शेलार हा 7 नोव्हेंबर 2010 पासून बेपत्ता होता. पुण्यात अंजला सोनटक्केने माओवादी विचारधारेचा प्रसार करून काही तरुणांना जाळ्यात ओढल्याचा आरोप असून त्यातील संतोष शेलार हा एक असल्याची माहिती आहे. संतोष आणि आणखी एक तरुण हे दोघे पुण्यातील ताडीवाला रस्ता येथून बेपत्ता झाले होते. संतोष हा कबीर कला मंचच्या काही कार्यकर्त्यांशी संपर्कात आला होता. त्यानंतर तो बेपत्ता झाल्याची तक्रार कुटुंबीयांनी दिली होती.
COMMENTS