मुंबई : मनी लाँड्रिंग प्रकरणात अटकेत असलेले, गेल्या अनेक दिवसांपासून आर्थर जेलमध्ये असलेले मंत्री नवाब मलिक यांची प्रकृती बिघडली असून, त्यांना जेजे र
मुंबई : मनी लाँड्रिंग प्रकरणात अटकेत असलेले, गेल्या अनेक दिवसांपासून आर्थर जेलमध्ये असलेले मंत्री नवाब मलिक यांची प्रकृती बिघडली असून, त्यांना जेजे रुग्णालयातील अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले आहे. गेल्या चार दिवसांपासून त्यांची प्रकृती खालावली आहे. त्यांना पोटात दुखत असल्याने त्यांच्यावर आता अतिदक्षता विभागात उपचार केले जात आहेत. मलिक यांना पोटदुखीचा त्रास जाणवत असून त्यांचा रक्तदाब स्थिर नाही. त्यांना आयसीयूमध्ये ठेवण्यात आले आहे. त्यांची प्रकृती गंभीर असल्याचे जेजे रुग्णालयाकडून सांगण्यात आले आहे.
त्यांना स्ट्रेचरवरून जेजे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. गेल्या चार दिवसांपासून त्यांची प्रकृती खालावली असल्याने मानवतावादी आधारावर अंतरिम वैद्यकीय जामिनासाठी मागणी करणार असल्याचे त्यांच्या वकिलांनी म्हटले आहे. मात्र, त्यांच्या जामिनाला विरोध करणार असल्याचे ईडीच्या वकिलांनी म्हटले आहे. त्यांच्या प्रकृतीची माहिती अगोदर का देण्यात आली नाही, अशी विचारणा त्यांनी केली आहे. मनी लाँड्रिंग प्रकरणात सक्तवसुली संचालनालयाने केलेल्या अटकेला आव्हान देणारी महाराष्ट्र मंत्रिमंडळातले मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांची याचिका सर्वोच्च न्यायालयानेसुद्धा फेटाळून लावली आहे. ही केस प्रारंभिक टप्प्यावर असून त्यात हस्तक्षेप करू शकत नाही, असे न्यायालयाने म्हटले होते. मलिक यांचा अंतरिम जामीन अर्ज मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळून लावला होता. त्यानंतर त्यांनी सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली होती. ईडीने मलिक यांना कायद्यानुसार अटक केली असून नियमानुसार त्यांची कोठडी घेतली आहे. अशा स्थितीत त्यांना तत्काळ जामीन देता येणार नाही, अशी टिप्पणी उच्च न्यायालयाने काही दिवसांपूर्वी केली होती.
COMMENTS