Homeताज्या बातम्यादेश

रेल विकास निगम लिमिटेडला नवरत्न दर्जा

नवी दिल्ली : रेल्वे विभागाची सार्वजनिक क्षेत्रातील केंद्रीय कंपनी, रेल विकास निगम लिमिटेडला नवरत्न हा दर्जा मिळाला आहे. 24 जानेवारी 2023 रोजी आरव

MSEB च्या नावाने बिल भरण्यासाठी फोन आल्यास सावधान | LOK News 24
पुणे विद्यापीठाच्या कँटीनमध्येविद्यार्थ्यांनी घातला गोंधळ
मेहबुबा मुफ्ती यांना ठेवले नजरकैदेत

नवी दिल्ली : रेल्वे विभागाची सार्वजनिक क्षेत्रातील केंद्रीय कंपनी, रेल विकास निगम लिमिटेडला नवरत्न हा दर्जा मिळाला आहे. 24 जानेवारी 2023 रोजी आरवीएनएलची सार्वजनिक क्षेत्रातील कंपनी म्हणून स्थापना करण्यात आली होती. रेल्वेशी संबंधित पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठीच्या क्षमता निर्माण करण्यासाठीच्या प्रकल्पांची जलदगतीने अंमलबजावणी करणे, आणि एसपीव्ही म्हणजे स्पेशल पर्पज व्हेईकल प्रकल्पांसाठी निधी उभारणे, अशा दोन प्रमुख उद्दिष्टांसाठी, या कंपनीची स्थापना करण्यात आली होती. कंपनीने, 2005 साली संचालक मंडळाची नियुक्ती करून आपल्या कामांना सुरुवात केली. सप्टेंबर 2013 मध्ये कंपनीला मिनी रत्न दर्जा देण्यात आला. कंपनीचे अधिकृत भाग भांडवल, 3000 कोटी रुपये इतके असून त्यापैकी, थेट समभाग भांडवल, 2085 कोटी रुपये इतके आहे.

COMMENTS