Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

जामखेड तालुक्याचा नवोदय विद्यालय परीक्षेत डंका

जामखेड ः  नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा 2024 मध्ये  गटविकास अधिकारी प्रकाश पोळ, गटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे यांच्या मार्गदर्शनाखाली जामखेड ताल

पाथर्डी आगारातून सत्तर दिवसांनंतर धावली लालपरी
आहिल्यादेवी होळकर जयंतीला यात्रा काढणारच : आ रोहित पवार
जळीतकांड दुर्घटनेचा तपास आयपीएस अधिकारी व सीआयडीकडे सोपवण्याची मागणी

जामखेड ः  नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा 2024 मध्ये  गटविकास अधिकारी प्रकाश पोळ, गटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे यांच्या मार्गदर्शनाखाली जामखेड तालुक्यातील सर्व विद्यार्थ्यांनी नेत्रदीपक कामगिरी केली आहे. नवोदय परीक्षा 2024 मध्ये जामखेड तालुक्यातील सायली रामहरी जगताप, आदित्य अभिमान घोडेस्वार, शौर्य विकास हजारे, अर्णव सुभाष ओमासे, अर्णव चंद्रकांत गाडेकर, शौर्य ब्रह्मदेव हजारे, उत्कर्ष रामेश्‍वर ढवळे, शिवसंस्कार दशरथ बिरंगळ, सोहम रामनाथ ढाकणे या विद्यार्थ्यांची नवोदय विद्यालय साठी निवड झाली आहे. एकूण 80 जागांपैकी 9 जागा एकट्या जामखेड तालुक्याने पटकावल्या आहेत ही अत्यंत अभिमानाची बाब आहे. गटविकास अधिकारी प्रकाश पोळ व गटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे  सर्व विस्तार अधिकारी केंद्रप्रमुख मुख्याध्यापक तसेच सर्व मार्गदर्शक शिक्षकांचे पालकवर्गातुन अभिनंदन होत आहे.

COMMENTS