Homeताज्या बातम्यादेश

बँक कर्मचार्‍यांचा आज देशव्यापी संप

नवी दिल्ली प्रतिनिधी : बँक कर्मचार्‍यांनी आपल्या प्रलंबित मागण्यासाठी आज शनिवारी एक दिवसीय संप पुकारल्यामुळे बँकाचे कामकाज ठप्प होणार आहे. अखिल भ

बाबा तरसेम सिंग हत्येतील मुख्य आरोपी ठार
विदर्भ, मराठवाड्यात पावसाचा धुमाकूळ
पाकिस्तान भूकंपाच्या धक्क्यांने हादरले

नवी दिल्ली प्रतिनिधी : बँक कर्मचार्‍यांनी आपल्या प्रलंबित मागण्यासाठी आज शनिवारी एक दिवसीय संप पुकारल्यामुळे बँकाचे कामकाज ठप्प होणार आहे. अखिल भारतीय बँक कर्मचारी संघटनेने एक दिवसीय संप पुकारला आहे. बँक ऑफ बडोदाने स्टॉक एक्स्चेंजकडे आपल्या नियामक फाइलिंगमध्ये माहिती दिली आहे की, ऑल इंडिया बँक एम्प्लॉईज असोसिएशन च्या सरचिटणीस यांनी इंडियन बँक असोसिएशनला संपावर जाण्यास सांगितले आहे. यात युनियनने आपल्या मागण्यांसाठी 19 नोव्हेंबर  रोजी संपावर जाण्याचा इशारा दिला होता.


कर्मचारी संघटना आणि इंडियन बँक्स असोसिएशन यांच्यात बुधवारी झालेल्या चर्चेत कोणताही सकारात्मक किंवा समाधानकारक तोडगा न निघाल्यामुळे बँक युनियन्सने 19 नोव्हेंबरचा नियोजित देशव्यापी संप करण्याचा निर्णय घेतला आहे. आयबीए आणि बँक व्यवस्थापनाशी झालेल्या चर्चेनंतर कोणताही तोडगा निघू शकलेला नाही. त्यामुळे 19 नोव्हेंबर नियोजित संप सुरुच ठेवू असे आम्ही त्यांना सांगितले. तसेच मुख्य कामगार आयुक्तांनाही कळवले आहे, असे एआयबीईएचे सरचिटणीस व्यंकटचलम यांनी सांगितले. बायपार्टाइट सेटलमेंटच्या तरतुदींमध्ये कोणताही बदल किंवा जोडणी परस्पर केली जाऊ शकते अशी आमची सूचना असूनही, आऊटसोर्सिंग, कर्मचार्‍यांची फिरती बदली, शिस्तभंगाच्या कृती प्रक्रियेचे पालन, ट्रेड युनियन प्रतिनिधित्व, नोकरी सुरक्षा यावर त्यांचे निर्णय मागे घेतील, असे कोणतेही स्पष्ट आश्‍वासन ते देऊ शकले नाहीत, असेही व्यंकटचलम पुढे म्हणाले. कर्मचारी संघटना आक्रमक झाल्याने आज शनिवारी देशभरातील बँकांचे कामकाज प्रभावित होणार आहे. बँक ऑफ बडोदाने संपाबाबतची माहिती दिली आहे. त्यानुसार अखिल भारतीय बँक कर्मचारी संघाच्या महासचिवाने संपाची नोटीस पाठवली आहे. संघटनेचे सदस्य 19 नोव्हेंबर रोजी संपावर जात असल्याचे या नोटीसमध्ये नमूद करण्यात आले आहे. हा संप एक दिवसाचा असेल. त्यामुळे मुख्य शाखांसह ग्रामीण भागातील शाखांवरही या संपाचा प्रभाव दिसून येईल. तरीही बँका ग्राहकांची गैरसोय टाळण्यासाठी काही उपाय करतात का याकडे ग्राहकांचे लक्ष लागले आहे.

COMMENTS