Homeताज्या बातम्यादेश

राष्ट्रीय तपास यंत्रणाचे देशभर छापे

पीएफआय संघटना रडारवर ; महाराष्ट्रासह 20 ठिकाणी कारवाई

नवी दिल्ली ः पीएफआय या संघटनेवर केंद्र सरकारने बंदी घातली असली तरी, या संघटनेच्या संशयास्पद हालचालीमुळे बुधवारी राष्ट्रीय तपास यंत्रणांनी देशातील

मुंबईचा किनारी रस्ता आणि वांद्रे-वरळी सागरी सेतू जोडण्यात यश
ये रिश्ता क्या कहलाता है… फेम अभिनेत्री वृषिका मेहता अडकली लग्न बंधनात!
जगाच्या आर्थिक व्यवस्थेतील सामाजिकता !

नवी दिल्ली ः पीएफआय या संघटनेवर केंद्र सरकारने बंदी घातली असली तरी, या संघटनेच्या संशयास्पद हालचालीमुळे बुधवारी राष्ट्रीय तपास यंत्रणांनी देशातील विविध राज्यात छापेमारी केल्यामुळे खळबळ उडाली आहे. यामध्ये उत्तरप्रदेश, राजस्थान, महाराष्ट्र आणि दिल्ली या राज्यांमधील ठिकाणांवर ही कारवाई करण्यात आली आहे.
पीएफआयवर मागील वर्षी बंदी घालण्यात आली होती. दहशतवादविरोधी बेकायदेशीर कारवाया कायद्यानुसार त्यावर बंदी घालण्यात आली होती. ही छापेमारी गुन्हा क्रमांक 31/2022 अन्वये करण्यात आली. हे प्रकरण पीएफआय, संघटनेचे नेते आणि कार्यकर्त्यांच्या हिंसक आणि बेकायदेशीर कारवायांमध्ये सहभागी होण्याशी संबंधित आहेत. या प्रकरणाशी संबंधित सर्व आरोपी हिंसक आणि बेकायदेशीर कारवायांच्या उद्देशाने बिहार राज्यातील पाटण्याच्या फुलवारी शरीफ भागात जमले होते. दिल्लीतील हौज काझी पोलीस स्टेशन क्षेत्रातील बल्ली मारन, राजस्थानमधील टोंक, तामिळनाडूमधील मदुराई, उत्तर प्रदेशातील बाराबंकी, लखनौ, बहराइच, सीतापूर आणि हरदोईसह अनेक ठिकाणी छापे टाकण्यात आले आहेत. राष्ट्रीय तपास यंत्रणेने लखनऊमधील माडेगंजमधील बडी पकारिया भागात छापा टाकला. दुसरीकडे राष्ट्रीय तपास यंत्रणेने महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी छापेमारी केली. महाराष्ट्रातील मुंबई, ठाणे, नवी मुंबई आणि इतर काही जिल्ह्यांमध्ये छापे टाकण्यात आले. राष्ट्रीय तपास पथकाने अब्दुल वाहिद शेख नावाच्या व्यक्तीच्या घरातही छापा टाकला. विक्रोळीतील त्याच्या घराशिवाय भिवंडी, मुंब्रा येथील ठिकाणांवर एनआयएने छापे टाकले. दरम्यान अब्दुल वाहिद शेखची 7/11 बॉम्बस्फोट प्रकरणात वाहिद शेखची निर्दोष मुक्तता करण्यात आली होती. संशयास्पद मोहिमा आणि निधी उभारणीच्या कारवायांमध्ये पीएफआयचा सहभाग असल्याच्या संशय एनआयएला आहे. याआधारे यंत्रणेनेने 7 ते 10 लोकांना ताब्यात घेतले आहे. यापूर्वी राष्ट्रीय तपास यंत्रणेने तिरुवनंतपुरम विमानतळावरून पीएफआय संशयिताला ताब्यात घेतले होते.

मुंबईच्या विक्रोळीत छापेमारी – पीएफआय संघटना प्रकरणात एनआयए देशभरात ठिकठिकाणी छापेमारी करत आहे. विक्रोळी पार्क साईट येथील वाहिद शेख यांच्या घरी पहाटेच्या सुमारास राष्ट्रीय तपास यंत्रणाचे पथक पोहोचले होते. मात्र वाहिद शेख हे दरवाजा उघडत नव्हता, जोपर्यंत योग्य नोटीस दाखवत नाही तोपर्यंत दरवाजा उघडणार नाही असा पवित्रा वाहिदने घेतला होता. त्यामुळे राष्ट्रीय तपास यंत्रणाचे पथक आणि पोलिस त्यांच्या घराबाहेर ठाण मांडून बसले होते. त्यानंतर पाच ते सहा तासानंतर वाहिदने दरवाजा उघडला आणि राष्ट्रीय तपास पथकाला घरामध्ये घेतले. त्यानंतर कारवाई करण्यात आली.

COMMENTS