Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

चिंचवडमध्ये ’राष्ट्रवादी’ त बंडखोरी

राहुल कलाटे यांनी केला अपक्ष अर्ज दाखल

पुणे/प्रतिनिधी ः पुणे जिल्हा सध्या दोन पोटनिवडणुकांमुळे गाजतांना दिसून येत आहे. कसबा पेठ मतदारसंघात भाजपकडून टिळक कुटुंबियांना न दिल्यामुळे टिळक

मामी फेस्टिव्हलसाठी प्रियंका चोप्रा मुंबईत दाखल
आपल्या उमेदवारांला मताधिक्य देण्यासाठी कार्यकर्त्यांचा जोर
तीनही कृषी कायद्यांविरोधात काँग्रेसचे राज्यभर आंदोलन

पुणे/प्रतिनिधी ः पुणे जिल्हा सध्या दोन पोटनिवडणुकांमुळे गाजतांना दिसून येत आहे. कसबा पेठ मतदारसंघात भाजपकडून टिळक कुटुंबियांना न दिल्यामुळे टिळक कुटुंबियांनी नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर चिंचवडमध्ये राष्ट्रवादी काँगे्रसने नाना काटे यांना उमेदवारी दिली आहे.  मात्र, येथून राहुल कलाटे यांनी बंडखोरी केली आहे. याप्रकरणी आपण मध्यस्थी करून मार्ग काढण्याचा प्रयत्न केला, पण यश आले नाही, अशी कबुली मंगळवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी दिली. मागील निवडणुकीत पंढरपूर, कोल्हापूर, देगलूर आदी ठिकाणच्या निवडणुका अशाच झाल्या. मात्र, येथे भाजपने सहानभुती न पाहता सायीस्कर उमेदवार उभे केले. त्यामुळे ही निवडणूक बिनविरोध होणार नसल्याचेही पवार यांनी स्पष्ट केले.

निवडणुकीत मेहनत, कष्ट घेतले तर जी जिंकणे अवघड नाही. मागील अनेक वर्षापासून मी पिंपरी चिंचवड मध्ये काम करत आहे. माझ्या राजकीय आयुष्याची सुरुवात पिंपरी चिंचवड शहरातून झालेली आहे. माझे शहराशी जुने नाते असून शहराचे जडणघडणीतून माझा सहभाग असून शहराचा कायापालट करण्यात आला आहे. अशियातील सर्वात श्रीमंत महानगरपालिका म्हणून पिंपरी चिंचवड मनपाची ओळख काहीकाळ होती. शहरातील राजकीय घडामोडींची मला जाण असल्याचे मत विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मंगळवारी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले. अजित पवार म्हणाले, चिंचवड विधानसभा मतदारसंघात उमेदवारी देण्याबाबत अद्याप आम्ही उशीर केलेला नाही. महाविकास आघाडीकडे पोटनिवडणुकीच्या दोन जागा होत्या त्यानुसार कसबा जागा काँग्रेसला देण्यात आली आहे. तर चिंचवडची जागा राष्ट्रवादी काँग्रेस लढत आहे. उद्या सदर अर्जांची छाननी होणार असून त्यानंतर उमेदवारी अर्ज माघार घेण्याची मुदत आहे.

‘मविआ’ची नाना काटेंना उमेदवारी – चिंचवडमध्ये महाविकास आघाडीतील नेत्यांनी उमेदवार उभा करण्याचे ठरवले आणि त्याप्रमाणे आम्ही नाना काटे यांचा अर्ज दाखल केला आहे. उद्धव ठाकरे यांनी मला काटे यांना शिवसेनेचा पाठिंबा राहिले असे स्पष्ट सांगितले. काँग्रेसनेही आम्हाला सकारात्मक प्रतिसाद दिलेला आहे. एखाद्या निवडणुकीत कोणाला मते मिळाली तर पुढील काळात ती मते संबंधितांनाच राहतात असे होत नाही. कलाटे यास मागील वेळी आम्ही मदत केलेली होती.

COMMENTS