मुंबई/प्रतिनिधी : राष्ट्रीय तपास यंत्रणेचे अर्थात एनआयएने आयसीस कनेक्शन तपास प्रकरणात तब्बल 6 राज्यातील 13 ठिकाणी छापे टाकले. यामध्ये महाराष्ट्रातील
मुंबई/प्रतिनिधी : राष्ट्रीय तपास यंत्रणेचे अर्थात एनआयएने आयसीस कनेक्शन तपास प्रकरणात तब्बल 6 राज्यातील 13 ठिकाणी छापे टाकले. यामध्ये महाराष्ट्रातील कोल्हापूर आणि नांदेड जिल्ह्याचा समावेश होता. मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही लोकांचा संबंध आयसीस सोबत असल्याची माहिती समोर आली होती.
एनआयएने देशभरात मध्य प्रदेश, गुजरात, बिहार, कर्नाटक, महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेश या सहा राज्यांमध्ये छापेमारी केली आहे. मध्य प्रदेशातील भोपाळ आणि रायसेन जिल्हा, गुजरातमधील भरूच, सुरत, नवसारी आणि अहमदाबाद जिल्हे, बिहारमधील अररिया, कर्नाटक राज्यातील भटकळ आणि तुमकूर, उत्तर प्रदेशातील देवबंद तर महाराष्ट्रातील कोल्हापूर आणि नांदेड जिल्ह्यातील एकूण 13 ठिकाणांवर एनआयएने ही कारवाई केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, एनआयएच्या अधिकार्यांना या धाडसत्रात काही महत्त्वाची कागदपत्रे, इलेक्ट्रॉनिक्स वस्तू आढळून आल्या आहेत. तसेच काही सेन्सेटिव्ह माहितीही एनआयएला तपासात आढळून आली आहे. या प्रकरणी काही जणांना एनआयएने ताब्यात सुद्धा घेतल्याचं वृत्त असून त्यांच्या चौकशीनंतर अटकेची कारवाई केली जाणार असल्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे. ताब्यात घेण्यात आलेल्या व्यक्तींची एनआयएकडून चौकशी सुरू करण्यात आली आहे.
COMMENTS