नवी दिल्ली :मानवी तस्करीशी संबंधित एका प्रकरणात राष्ट्रीय तपास यंत्रणा अर्थात एनआयएने 6 राज्यात तब्बल 22 ठिकाणी छापेमारी केली. इंटेलिजन्स इनपुटच्
नवी दिल्ली :मानवी तस्करीशी संबंधित एका प्रकरणात राष्ट्रीय तपास यंत्रणा अर्थात एनआयएने 6 राज्यात तब्बल 22 ठिकाणी छापेमारी केली. इंटेलिजन्स इनपुटच्या आधारे, मानवी तस्करीमध्ये गुंतलेल्या टोळीला पकडण्यासाठी दिल्ली, उत्तर प्रदेश आणि बिहारसह इतर राज्यांमध्ये छापे टाकण्यात आले आहेत. यामध्ये मोठे नेटवर्क असण्याची शक्यता आहे.
हे नेटवर्क तरुणांना परदेशात नोकरीचे आमिष दाखवून त्यांची तस्करी करते. यानंतर त्यांना सायबर फसवणूक करणार्या बनावट कॉल सेंटरमध्ये काम करण्यास भाग पाडले जाते. बिहारच्या गोपालगंजमध्ये त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. एनआयएने हे प्रकरण स्थानिक पोलिसांकडून ताब्यात घेतले होते.
COMMENTS