Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

कोपरगाव तहसील आवारात राष्ट्रीय ग्राहक दिन उत्साहात

शासकीय योजनेची माहिती देणार्‍या स्टॉलचे आकर्षण

कोपरगाव शहर ः इ.स. 1986 साली 24 डिसेंबर या दिवशी ग्राहक हक्क कायद्याला भारताच्या राष्ट्रपतींनी मंजुरी दिली होती. तेव्हापासून 24 डिसेंबर हा दिवस र

महात्मा फुले यांनी समाजाला खरी दिशा दिली : खा. डॉ. सुजय विखे
पिसाळलेल्या कुञ्याने चाव्यानेे आठ गायींसह शेळीचा मृत्यू
रेनबो स्कूलचे जिल्हास्तरीय बास्केटबॉल स्पर्धेत यश

कोपरगाव शहर ः इ.स. 1986 साली 24 डिसेंबर या दिवशी ग्राहक हक्क कायद्याला भारताच्या राष्ट्रपतींनी मंजुरी दिली होती. तेव्हापासून 24 डिसेंबर हा दिवस राष्ट्रीय ग्राहक दिन म्हणून साजरा केला जातो. हा कायदा अस्तित्वात यावा यासाठी अनेक संस्था आणि कार्यकर्त्यांना प्रयत्न करावे लागले होते. ग्राहक संरक्षण कायद्यानुसार प्रत्येक भारतीय ग्राहकाला सहा हक्क मिळाले यात सुरक्षेचा हक्क, माहितीचा हक्क, निवड करण्याचा अधिकार,म्हणणे मांडण्याचा हक्क, तक्रार व निवारण करून घेण्याचा हक्क व ग्राहक हक्कांच्या शिक्षणाचा अधिकार या हक्कांची सामान्यांना जनजागृती व्हावी या उद्देशाने 24 डिसेंबर हा दिवस संबंध भारत भर मोठ्या जल्लोषात राष्ट्रीय ग्राहक दिन म्हणुन साजरा केला जात असतो त्याच अनुषंगाने कोपरगाव तहसिल कार्यालय येथील प्रशासकिय इमारतीमध्ये  शुक्रवार दि 29 डिसेंबर रोजी मोठ्या उत्साहात जिल्हास्तरीय राष्ट्रीय ग्राहक दिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे उद्घाटन अहमदनगरचे अतिरिक्त जिल्हाधिकारी सुहास मापारी यांच्या हस्ते झाले. या प्रसंगी कोपरगावचे तहसीलदार संदीपकुमार भोसले,अपर तहसीलदार विकास गंबरे आदी मान्यवर उपस्थित होते.
या प्रसंगी आयोजित कार्यक्रम स्थळी शासनाच्या विविध योजनांची सेवा, सुविधा व माहिती देणारे सेतू सुविधा माहिती केंद्र, विविध गॅस कंपनीची माहिती देणारे केंद्र, बँकिंग विषयी माहिती देणारे स्टेट बँक ऑफ इंडिया, सेंट्रल बँक ऑफ इंडिया व समता नागरी सहकारी पतसंस्था यांचे स्टॉल, शिक्षण विभागाच्या वतीने शैक्षणिक माहिती देणारा स्टॉल, शेतकर्‍यांना कृषी योजनेची माहिती देणारा कृषी विभागाचा स्टॉल, आरोग्य विभागाच्या वतीने आयुष्यमान भारत गोल्डन कार्ड विषयी माहिती देणारे तसेच मतदारांना मतदानाचा अधिकार व तसेच प्रत्यक्षात मतदान कसे केले जाते याचे प्रात्यक्षिक देणारे ईव्हीएम मशीन आदी लावण्यात आलेल्या स्टॉल वर अहमदनगरचे अतिरिक्त जिल्हाधिकारी सुहास मापारी, तहसीलदार संदीपकुमार भोसले,अपर तहसीलदार विकास गंबरे, महाराष्ट्र राज्य पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष काकासाहेब कोयटे, शहर पोलिस निरीक्षक प्रदीप भोसले, सहाय्यक पोलिस निरीक्षक भरत दाते, सहाय्यक गटविकास अधिकारी बाळासाहेब साबळे, पुरवठा अधिकारी कुंभार साहेब, स्वस्त धान्य दुकान संघटनेचे अध्यक्ष उत्तम चरमळ, जनार्धन जगताप  आदी मान्यवरानी भेटी दिल्या तर अनेक शालेय विदयार्थी व विदयार्थीनी यांच्या सह नागरिकांनी प्रत्यक्षात भेट देवुन गाहक चळवळीचे व शासन स्तरावरुन राबविण्यात येणार्‍या विविध योजनेचे महत्व जाणुन घेतले. कार्यक्रम यशस्वीते साठी कोपरगाव तहसिल कार्यलय तसेच कृषी, पुरवठा आदी विभागातील सर्व अधिकारी कर्मचारी यांनी अथक परिश्रम घेतले.

COMMENTS