Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

दुहेरी हत्याकांडाने नाशिक हादरलं !

नाशिक प्रतिनिधी - अंबड -लिंकरोडवरील संजीवनगर येथे दहा ते बारा जणांच्या टोळक्याने धारदार शस्त्राने हल्ला करून दोघा सख्ख्या भावांची हत्या करण्यात

माजी महापौर विश्‍वनाथ महाडेश्‍वर यांचे निधन
ज्येष्ठ अभिनेत्री सीमा देव यांचे निधन
बाबासाहेब शेलार यांचा नागरी सत्कार

नाशिक प्रतिनिधी – अंबड -लिंकरोडवरील संजीवनगर येथे दहा ते बारा जणांच्या टोळक्याने धारदार शस्त्राने हल्ला करून दोघा सख्ख्या भावांची हत्या करण्यात आली. मेराज खान (वय १८) व इब्राहिम खान (वय २३) अशी त्यांची नावे आहेत किरकोळ वादातून गुरुवारी रात्री साडेसात वाजेच्या सुमारास संजीवनगर येथील खंडेराव मंदिर, शिवनेरी चौकात हा प्रकार घडला. मेराज याचा घटनास्थळीच मृत्यू झाला, तर इब्राहिम जिल्हा रुग्णालयात उपचारांदरम्यान मरण पावला. दोघेही संजीवनगर येथील राहणारे होते. एकाचा मासे विक्रीचा, तर दुसऱ्याचा फॅब्रिकेशनचा व्यवसाय होता. या हल्ल्याची घटना सीसीटीव्ही कैद झाली आहे. तिसऱ्या भावाने जागेवरून पळ काढल्याने तो बचावला आहे. दीड महिन्यापूर्वी लहान मुलांमध्ये हाणामाऱ्या झाल्या होत्या, याच कारणावरून गुरुवारी सायंकाळी चुंचाळे येथून आलेल्या दहा ते बारा जणांच्या टोळक्याने मिराज याचा रस्ता अडवून त्याला मारहाण करण्यास सुरुवात केली, याचवेळी इब्राहिम त्यास वाचविण्यास गेला असता, टोळक्याने त्याच्यावरही हल्ला चढवला.

COMMENTS