Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

नाशिक लोकसभेसाठी 500 उमेदवार देणार; मराठा समाजाचा निर्धार 

नाशिक प्रतिनिधी - राज्य शासनाने मराठा आरक्षणाचा प्रश्न नीट हाताळला नाही.समाजाची फसवणूक केली.आरक्षणाबाबत अन्याय केला.अशी मराठा समाजाची भावना झाली

धमकी प्रकरणाची सखोल चौकशी करावी : भुजबळ
बिटको रुग्णालयात तंत्रकुशल मनुष्यबळ हवे ; माजी नगरसेवक जगदीश पवार यांची मागणी  
नवले पुलावरील अपघातात एकाचा मृत्यू

नाशिक प्रतिनिधी – राज्य शासनाने मराठा आरक्षणाचा प्रश्न नीट हाताळला नाही.समाजाची फसवणूक केली.आरक्षणाबाबत अन्याय केला.अशी मराठा समाजाची भावना झाली आहे.या प्रश्नाबाबत सातत्याने विविध आश्वासने देऊनदेखील प्रत्यक्षात काहीही कृती करण्यात आलेली नाही.यामध्ये भारतीय जनता पक्षाचे नेते देवेंद्र फडणवीस यांच्याविषयी व मराठा समाजाचे आमदार खासदार प्रामुख्याने ज्यांना समाजाने आतापर्यंत मराठा म्हणून निवडून दिले अशा लोकप्रतिनिधींच्या बद्दल समाजाचा राग आहे. त्याचे पडसाद येत्या निवडणुकीमध्ये उमटलेले दिसतील. नाशिक शहरातील तरुण युवक युवती येत्या लोकसभा निवडणुकीमध्ये उमेदवारी अर्ज दाखल करतील.मराठवाड्यातून नाशिकमध्ये स्थायिक झालेले 200 हून अधिक नागरिकदेखील आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. नाशिक जिल्ह्यातून प्रामुख्याने रिटायर झालेले अधिकारी, डॉक्टर,इंजिनीयर,शेतकरी,कामगार, महिला वर्गातूनही काही उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आमची तयारी सुरू झाली आहे.

मराठा समाजाला आरक्षण देण्याचे आश्वासन देण्यात आले होते.याशिवाय सगेसोयरे याबाबतचा अध्यादेश काढण्यात येईल,असे मुख्यमंत्र्यांनी मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे- पाटील यांना वाशी येथे दिले होते.त्याबाबत काहीही कार्यवाही करण्यात आली नाही.उलट मनोज जरांगे- पाटील यांची एसआयटी चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.हे सर्व मराठा आरक्षणाचे नेते जरांगे- पाटील यांना अडचणीत आणण्याचे डावपेच आहेत. राज्य शासनाच्या या धोरणाविरुद्ध समाजामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात आक्रोश आहे.त्यामुळेच मोठ्या प्रमाणावर कार्यकर्ते उमेदवारी अर्ज दाखल करतील, त्यातून मतदान यंत्राऐवजी बॅलेट पेपरवर निवडणूक नेण्याचा प्रयत्न असेल

लोकसभा निवडणुकीची तयारी जोरदारपणे सुरू आहे.विविध राजकीय पक्ष सध्या जागावाटप आणि उमेदवार निश्चित करण्यात व्यस्त आहेत. अशा स्थितीत सकल मराठा समाजदेखील गुप्तपणे सगळ्या ठिकाणी उमेदवारांचे कागदपत्र त्यासाठी लागणारे डिपॉझिट रक्कम गाव पातळीवर शहर पातळीवर जमा करण्याचं काटेकोर नियोजन सुरू आहे. कोण उमेदवार अर्ज भरतील याबाबत शेवटच्या क्षणापर्यंत पूर्णपणे गुप्तता पाळली जाणार असून उमेदवारी अर्ज दाखल करायच्या शेवटच्या दोन दिवसांमध्ये मराठा समाजाचे सगळे नियोजित केलेले पाचशेच्या वरती उमेदवार आपले उमेदवारी अर्ज दाखल करून मराठा समाजाचा रोष या लोकसभेत दाखवून देण्यासाठी सज्ज झालेला आहे. करण गायकर राज्य समन्वयक मराठा क्रांती मोर्चा

COMMENTS